deepak kesarkar on narayan rane | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

राणेंपेक्षा मीच कितीतरी पटीने सरस : दीपक केसरकर 

सरकारनामा ब्युरो 
गुरुवार, 20 एप्रिल 2017

आमदार नारायण राणेंपेक्षा मी कितीतरी पटीने सरस आहे. कोकणात अवघ्या दोन वर्षात विकासकामांतून कर्तृत्व सिद्ध केले. राणे यांचा इतिहास सर्वज्ञात आहे, असे सांगून गृहराज्य मंत्री दीपक केसरकर यांनी राणें पेक्षा आपणच श्रेष्ठ असल्याचा दावा पत्रकार परिषदेत केला. 

कोल्हापूर : आमदार नारायण राणेंपेक्षा मी कितीतरी पटीने सरस आहे. कोकणात अवघ्या दोन वर्षात विकासकामांतून कर्तृत्व सिद्ध केले. राणे यांचा इतिहास सर्वज्ञात आहे, असे सांगून गृहराज्य मंत्री दीपक केसरकर यांनी राणें पेक्षा आपणच श्रेष्ठ असल्याचा दावा पत्रकार परिषदेत केला. 

आमदार राणे यांचे भाजपातील नेत्यांशी वाढती जवळीक आणि दौरे यांमुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत. कोकणचा राजा म्हणून एकेकाळी दबदबा असलेले राणे शिवसेनेतून कॉग्रेसमध्ये आले. आता त्यांचा भाजप प्रवेश होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. राणे भाजप मध्ये प्रवेशाबद्दल मत विचारल्यानंतर मंत्री केसरकर म्हणाले,"" कोकणात अवघ्या दोन वर्षात केलेल्या विकासकामाआधारे मी माझे कर्तृत्व सिद्ध केले आहे. आमदार नारायण राणे पेक्षा विकासकामात मी अधिक सरस आहे. कोकणात भाजप आणि शिवसेनेच्या ताब्यातच जास्तीत जास्त स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. मालवण मधील राणे यांचा विजय हा त्याला अपवाद आहे. राणे यांनी आत्तापर्यंत केलेल्या कोकणच्या विकासापेक्षा गेल्या दोनच वर्षात निधींचा वर्षाव कोकणावर केला आहे. विकासकामांतून मी माझे कतृत्व सिद्ध केले आहे. राणे यांचा राजकारणातील इतिहास सर्वज्ञात आहे. त्यामुळे त्यांच्या बाबत नवीन काही सांगायची गरज नाही. भाजपला त्यांचे वर्तन पटत असेल तर ते त्यांना पक्षात घेतील. हा त्यांचा प्रश्‍न आहे. शिवसेनेत मात्र सर्व निर्णय कार्याध्यक्ष उद्धवजी ठाकरेच घेतात.'' 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख