आजचा वाढदिवस : दिलीप गांधी, खासदार, भाजप, नगर  - deelip gandhi nagar bjp | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

आजचा वाढदिवस : दिलीप गांधी, खासदार, भाजप, नगर 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 9 मे 2018

खासदार दिलीप गांधी यांचा भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष म्हणून राजकारणात प्रवेश झाला. नगरसेवकपदापासून त्यांनी शहरातील काम सुरू केले. 1985 ते 99 दरम्यान नगरपालिकेचे ते उपाध्यक्ष होते. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून 1999 मध्ये त्यांची लोकसभेवर निवड झाली. 2009 व 2014 च्या च्या निवडणुकीत पुन्हा ते खासदार झाले. अवजड उद्योग मंत्रिपदही त्यांनी भूषविले. सहकार क्षेत्रातील नगर अर्बन बॅंकेचे ते अध्यक्ष आहेत. नगरला औद्योगिक वसाहतीत सुधारणा व्हावी, नगरमधील रेल्वेचे प्रश्न आदींसाठी त्यांचा प्रयत्न असतो. नगरमधील उड्डाणपुलाच्या मंजुरीसाठी त्यांनी प्रयत्न केले.

खासदार दिलीप गांधी यांचा भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष म्हणून राजकारणात प्रवेश झाला. नगरसेवकपदापासून त्यांनी शहरातील काम सुरू केले. 1985 ते 99 दरम्यान नगरपालिकेचे ते उपाध्यक्ष होते. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून 1999 मध्ये त्यांची लोकसभेवर निवड झाली. 2009 व 2014 च्या च्या निवडणुकीत पुन्हा ते खासदार झाले. अवजड उद्योग मंत्रिपदही त्यांनी भूषविले. सहकार क्षेत्रातील नगर अर्बन बॅंकेचे ते अध्यक्ष आहेत. नगरला औद्योगिक वसाहतीत सुधारणा व्हावी, नगरमधील रेल्वेचे प्रश्न आदींसाठी त्यांचा प्रयत्न असतो. नगरमधील उड्डाणपुलाच्या मंजुरीसाठी त्यांनी प्रयत्न केले. आता त्यास मंजुरी मिळाली असून, लवकरच काम सुरू होणार आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख