Dead Farmers Daughter ties Aditya Thakray Rakhi | Sarkarnama

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलीने रडत रडत आदित्य ठाकरेंना राखी बांधली 

सरकारनामा ब्युरो 
रविवार, 26 ऑगस्ट 2018

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी त्र्यंबकेश्‍वर येथे आधारतीर्थ आश्रमशाळा सुरु केली. या आश्रमशाळेला परिसरातील विविध औद्योगिक संस्था, नेते, लोकप्रतिनिधी भेट देत असतात. विविध प्रकारची मदत त्यांना नियमितपणे मिळते. मात्र, नियमात तरतुद नसल्याने या शाळेला मान्यता नाही. मान्यता मिळावी यासाठी संस्थाचालक आश्रमशाळेतील मुलांना विविध राजकीय नेते, मंत्र्यांचा कार्यक्रमात पाठवतात. मुलांमार्फत नेत्यांपर्यंत आपली मागणी पोहोचवतात. 

नाशिक : महिलांसाठी ज्युदो, कराटे प्रशिक्षण कार्यक्रम झाला. त्याला युवा सेना नेते आदित्य ठाकरे यांनी भेट दिली. यावेळी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींनी आपली व्यथा मांडण्यासाठी त्यांचा रस्ता अडवला. यावेळी पल्लवी ठाकरे हिने रडत रडत आपली व्यथा मांडली. रक्षा बंधनाच्या पूर्वसंध्येला त्यांनी आदित्य ठाकरेंना राखी बांधली. त्यांना आपल्या आश्रमशाळेला मान्यतेसाठी मदतीचा धावा करतांना पाहून आदित्य ठाकरेंचे मन द्रवले. अचानक घडलेल्या या प्रसंगाने उपस्थित शिवसेना नेत्यांचीही धावपळ झाली. 

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी त्र्यंबकेश्‍वर येथे आधारतीर्थ आश्रमशाळा सुरु केली. या आश्रमशाळेला परिसरातील विविध औद्योगिक संस्था, नेते, लोकप्रतिनिधी भेट देत असतात. विविध प्रकारची मदत त्यांना नियमितपणे मिळते. मात्र, नियमात तरतुद नसल्याने या शाळेला मान्यता नाही. मान्यता मिळावी यासाठी संस्थाचालक आश्रमशाळेतील मुलांना विविध राजकीय नेते, मंत्र्यांचा कार्यक्रमात पाठवतात. मुलांमार्फत नेत्यांपर्यंत आपली मागणी पोहोचवतात. 

अशातच पल्लवी ठाकरे या मुलीने आदित्य ठाकरे यांची वाट अडवुन त्यांनी याविषयी रडत रडत सांगीतली. "मी शेतकरी कुटुंबातील मुलगी आहे. वडिलांनी आत्महत्त्या केली. कुटुंब उध्वस्त झाले. माझ्यासारखे अनेक भाऊ-बहिण आधारतिर्थ आश्रमात आहेत. आमच्या आश्रमाच्या प्रस्तावाची फाईल मुख्यमंत्र्यांकडे मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे, आपण लक्ष घालून ती मंजूर करून आम्हांला आधार द्यावा.' अशी विनंती हात जोडून पल्लवीने ठाकरेने आदित्य ठाकरेंकडे केली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख