जिल्हा बँकेचे संचालक दादाराजे खर्डेकर यांची निधन

.
Dadaraje-Khardekar
Dadaraje-Khardekar

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे जेष्ठ संचालक यशवंत अप्पासाहेब उर्फ दादाराजे खर्डेकर यांचे (वय ८१ ) आज फलटण येथे हृदयविकाराने खाजगी रुग्णालयात निधन झाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय असणारे दादाराजे खर्डेकर यांचे  सातारा जिल्ह्याच्या राजकारणात वेगळे वजन होते. फलटण तालुक्यातील आसू हे मूळ गाव होय.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक, फलटण एज्युकेशन सोसायटीचे सदस्य, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष, राज्य कॉटन फेडरेशनचे संचालक, राज्य सहकार परिषदेचे संचालक, काळेश्वर कॉटन व जिनिंग अँड प्रेसिंग को ऑपरेटीव्ह सोसायटीचे संस्थापक अशी विविध पदे त्यांनी भूषवली होती. 

आसू येथील प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांचा नावलौकिक होता. फलटण येथील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असताना आज सकाळी साडेअकरा वाजता हृदयविकाराने निधन झाले. आजशुक्रवारी सायंकाळी पाच वाजता आसू, ता. फलटण येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सातारा, जावली मतदारसंघाचे माजी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे ते मामा होत.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com