जिल्हा बॅंक अध्यक्षपदासाठी रामकृष्ण बाबा, पालोदकर, नितीन पाटील यांची नावे चर्चेत

 जिल्हा बॅंक अध्यक्षपदासाठी रामकृष्ण बाबा, पालोदकर, नितीन पाटील यांची नावे चर्चेत

औरंगाबाद : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांच्या निधनानंतर रिक्‍त झालेल्या अध्यक्षपदासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. चार जुनला होणाऱ्या या निवडणुकीसाठी रामकृष्ण बाबा पाटील, प्रभाकर पालोदकर, नितीन पाटील आणि हरिभाऊ बागडे यांची नावे चर्चेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सुरेश पाटील यांच्यानंतर जिल्हा बॅंकेचा अध्यक्ष कोण होणार? या विषयी संचालक मंडळात चर्चा सुरू झाली आहे. 15 एप्रिल रोजी अध्यक्षपदासाठी निवडणुक होणार होती. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे राज्यातील निवडणूक पात्र सहकारी संस्था व त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडणुका 31 मेपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. 

सुरेश पाटील यांच्या मृत्यूनंतर सहनुभूती म्हणून त्यांचे पुत्र माजी आमदार आमदार नितीन पाटील यांचे नाव काही संचालकांनी पुढे केले होते. मात्र निवडणुक लांबल्यामूळे आता नव्या इच्छूकांची संख्या देखील वाढली आहे. दहा वर्षे अध्यक्ष राहिलेले रामकृष्णबाबा पाटील यांचे नाव अचानकपणे आघाडीवर आले आहे. त्यापाठोपाठ प्रभाकार पालोदकर, नितिन पाटील आणि विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या नावांची देखील चर्चा सुरू आहे. या चार संचालकांपैकी एकाची वर्णी अध्यक्षपदावर लागणार एवढे मात्र निश्‍चित. 

या विषयी रामकृष्ण बाबा पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, बॅंकेच्या संचालक मंडळामध्ये अध्यक्ष कोण असावा याबद्दल एकमत आहे. त्यामुळे जे नाव अध्यक्षपदासाठी समोर येईल त्याला मान्यता दिली जाईल.आजच्या स्थितीत अध्यक्ष कोण होईल हे सांगणे शक्‍य नाही. मराठवाड्यातील लातूर आणि औरंगाबादच्या जिल्हा सहकारी बॅंकेचे स्थिती चांगली आहे. एकीकडे बॅंका बंद पडत असताना, मध्यवर्ती सहकारी बॅंकेत सर्वपक्षीय नेत्यांना सोबत घेत ही बॅंक सुरेश पाटील यांनी नफ्यात आणली होती. बॅंकेतर्फे संचालक मंडळाच्या बैठकीत होणाऱ्या सर्व निर्णयासह एकमताने मंजुरी मिळत होती. आता अध्यक्षपदाची धुरा कोणाच्या हाती येईल. याकडेच सर्वांचे लक्ष लागून आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com