नागपूर पश्चिममध्ये तिवारी, गुप्ता फलकामुळे आले चर्चेत  

नागपूर पश्‍चिम विधानसभा मतदारसंघात `पश्‍चिम नागपूर की यही पुकार... हिंदी भाषी अब की बार !' अशा मजकुराचे फलक लागल्याने विविध चर्चांना उत आला आहे. येथे विद्यमान आमदार भाजपचे सुधाकर देशमुख आहेत. त्यामुळे त्यांची तिकीट कापण्याची तयारी तर भाजपचाच एक गट करत नाही ना? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.
नागपूर पश्चिमध्ये या फलकामुळे दयाशंकर तिवारी, जयप्रकाश गुप्ता चर्चेत
नागपूर पश्चिमध्ये या फलकामुळे दयाशंकर तिवारी, जयप्रकाश गुप्ता चर्चेत

नागपूर - नागपूर पश्‍चिम विधानसभा मतदारसंघात `पश्‍चिम नागपूर की यही पुकार... हिंदी भाषी अब की बार !' अशा मजकुराचे फलक लागल्याने विविध चर्चांना उत आला आहे. येथे विद्यमान आमदार भाजपचे सुधाकर देशमुख आहेत. त्यामुळे त्यांची तिकीट कापण्याची तयारी तर भाजपचाच एक गट करत नाही ना? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

पश्‍चिम नागपुरात हिंदी भाषिक मतदारांची संख्या सुमारे एक लाखाच्या घरात आहे. त्यामुळे येथील आमदार हा हिंदी भाषिक असावा, असा सूर गेल्या काही काळापासून या भाषकांमध्ये उमटत आहे. अखेरीस काल या भावना बॅनरच्या रुपात बाहेर आल्या. 

भाजपच्या श्रेष्ठींकडे या मागणीने जोर धरला आणि हिंदी भाषिक उमेदवाराला तिकीट द्यायची झाल्यास ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी आणि जयप्रकाश गुप्ता ही दोन नावे प्रामुख्याने समोर येतात. उत्तर भारतीय असलेले तिवारी यांचा पालिकेतील कामाचा दांडगा अनुभव आहे आणि ते उत्कृष्ठ वक्ता आहेत. पश्‍चिम नागपुरातून ते इच्छुक असले तरी त्यांचा निवास मध्य नागपुरात आहे. मध्य नागपुर हा मुस्लीम व हलबाबहुल मतदारसंघ आहे. 2009 मध्ये ते येथून भाजपच्याच तिकाटावर लढले होते. पण पराभूत झाले. यावेळीही येथून निवडून येण्याची शक्‍यता कमीच असल्याने त्यांनी पश्‍चिमेकडे कुच केले आहे. "हीन्दी भाषी अबकी बार...' चे बॅनरही तिवारींनीच लावल्याचे सूत्र सांगतात.

दुसरे संभाव्य उमेदवार जयप्रकाश गुप्ता हे पूर्वी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष राहीलेले आहेत. निवडणूक लढविल्याचा अनुभव त्यांच्या पाठिशी नाही. पण भाजपची हवा पाहता हिंदी भाषिक म्हणून गुप्ताही पुढे सरसावले आहेत. हिंदी भाषिक उमेदवाराला तिकीट द्यायचे झाल्यास तिवारींचे पारडे जड राहील, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com