मराठी दिनाच्या दिवशी आमदार श्वेता महालेंच्या साडीची विधानभवनात चर्चा

....
shweta-mahale saree
shweta-mahale saree

मुंबई : विधीमंडळाच्या आवारात दिमाखात पार पडलेल्या मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमाली एका देखण्या साडीचा साज चढला; ती आमदार श्‍वेता महाले यांनी नसलेल्या बनारसीच्या!  `मातृभाषा' अशा आशयाचा मजकूर असलेली आमदार महालेंची साडी साऱ्या विधीमंडळ आवाराचं गुरुवारी लक्ष वेधून घेत महिला आमदारांच्या कौतुकात रंगली.

अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून अगदी वेळेत विधिमंडळात हजेरी लावणाऱ्या श्‍वेता महाले गुरुवारी सकाळीही वेळेत आवारात आल्या. तेव्हाच, ग्रंथदिंडी आणि अन्य कार्यक्रमांनी आवार फुलला होता आणि दुसऱ्या बाजुला आमदार महालेंचे आगमन झाले. महाले विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आल्या आणि त्यांच्या मैत्रीण आमदार मेघना बोर्डीकर यांनी साडीच्या रंगापासून त्यावरील मजकुराचे कौतुक केले. पायऱ्यांवरच्या गर्दीतून  महाले पुढे सरकल्या, तेव्हा आजुबाजूला त्यांच्या साडीचीच चर्चा होती.  आज मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने त्यांनी विधानसभेत संस्कृत श्लोक असलेली साडी परिधान केली होती. या साडीमुळे त्यांनी सर्वांचंच लक्ष वेधून घेतले. साडीवर “मातृभुमे! नमो मातृभुमे! नम: , तव गरिभ्यो नमस्ते नदीभ्यो नम:, तव वनेभ्यो नमो जनपदेभ्यो नम:”  अशी संस्कृत वचनं लिहिली होती.

आमदार श्‍वेता महाले आपल्या साडीबद्दल बोलताना म्हणाल्या, ""भारतातील प्रसिध्द कारागिरांच्या प्रदर्शनातील ही साडी मला पहिल्याच नजरेत आवडली. तिच्यावरचे रंगसंगती  खूप छान आहे. ती आता सगळ्यांनाच आवडली आहे.''

आमदार श्‍वेता महाले या चिखली मतदारसंघातून आमदार आहेत. त्या पहिल्यांदाच आमदार झाल्या आहेत, या आधी त्या जिल्हा परिषदेच्या सदस्य होत्या. त्यांनी भाजपच्या तिकिटावर विधानसभा निवडणुकीत लढविण्याचा निर्णय घेतला आणि ही निवडणूक जिंकली. औषधनिर्माण शास्त्राची पदवी घेतलेल्या महाले सध्या विधीमंडळात आक्रमकपणे काम करतात. सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील आंदोलनात सहभागी होतात, त्याचवेळी माध्यमांशी संवाद साधत, ठाकरे सरकारवर जोरदार आरोपही करण्यात त्या पुढे असतात.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com