राष्ट्रवादीची साथ सोडणार नाही - आमदार दौलत दरोडा

कालपासून बेपत्ता असलेले राष्ट्रवादीचे आमदार दौलत दरोडा यांनी आपण सुरक्षित असून, राष्ट्रवादीची साथ सोडणार नसल्याचे सोशल मिडियावर शेअर केलेल्या व्हिडिओत म्हटले आहे.
राष्ट्रवादीची साथ सोडणार नाही - आमदार दौलत दरोडा

पुणे - कालपासून बेपत्ता असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहापूरचे आमदार दौलत दरोडा यांनी `आपण सुरक्षित असून, राष्ट्रवादीची साथ सोडणार नसल्याचे' सोशल मिडियावर शेअर केलेल्या व्हिडिओत म्हटले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर राज्यात राजकीय भूकंप झाला. शहापूरचे राष्ट्रवादीचे आमदार दौलत दरोडा हे कालपासून बेपत्ता होते. त्यांचा मुलाचाही त्यांच्याशी संपर्क झालेला नव्हता. त्यामुळे दरोडा कुटुबियांमध्ये चिंतेचे वातावरण होते. त्यामुळे ते बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाली होती. 

आज सकाळी दौलत दरोडा यांनी आपल्या फेसबुक पेजवर एक व्हिडिओ शेअर करत सुरक्षित असल्याचे म्हटले आहे. त्यात ते म्हणतात, की मी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेला व आदरणीय पवारसाहेबांचे नेतृत्व मान्य करणारा लोकप्रतिनिधी आहे. मी सुरक्षित आहे व कुठल्याही परिस्थितीत पक्षाची साथ सोडणार नाही!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com