सूनबाई शिवसेनेत गेल्या तरी सासरे राष्ट्रवादीतच राहणार!

सूनबाई शिवसेनेत गेल्या तरी सासरे राष्ट्रवादीतच राहणार!

पुणे : वडिल किंवा सासरे हे काॅंग्रेस किंवा राष्ट्रवादीत मुले आणि सुना मात्र भाजप-शिवसेनेत, असा प्रकार सध्या महाराष्ट्रात घडताना दिसतो आहे. याला करमाळ्यातील रश्मी बागल या देखील अपवाद नाहीत. राष्ट्रवादीचे प्रवक्ते विजय कोलते यांच्या सून असलेल्या रश्मी यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. त्यांचे सासऱ्यांनी मात्र आपण राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

रश्मी यांचा विवाह गौरव कोलते यांच्याशी झाला. दोन्ही घराणी ही राष्ट्रवादीशी संबंधित होती. हा विवाह राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जुळवून आणला होता. गौरव हे उद्योजक आहेत. विजय कोलते हे शरद पवार यांचे जुने कार्यकर्ते. ते पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. तसेच त्यांनी 1990 मध्ये पुरंदरमधून काॅंग्रेसकडून विधानसभेची निवडणूक लढविली होती.

करमाळ्याच्या रश्मी बागल या पुरंदरच्या सूनबाई असल्या तरी त्यांनी करमाळ्याशी आपली नाळ कायम ठेवली. गेल्या निवडणुकीत त्या राष्ट्रवादीच्या उमेदवार होत्या. शिवसेनेचे नारायण पाटील यांनी त्यांचा केवळ 254 मतांनी पराभव केला. या वेळी राष्ट्रवादीकडून रश्मी बागल यांची उमेदवारी निश्चित होती. मात्र सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे हे पुन्हा करमाळ्यातून उभे राहणार असल्याचे दिसून आल्याने बागल यांनी आता शिवसेनेचे शिवबंधन बांधले आहे.

शिवसेनेकडून रश्मी यांना उमेदवारीची खात्री असल्याने त्यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. मी मात्र पुरंदरमध्ये राष्ट्रवादीचेच काम करणार आहे, असे विजय कोलते यांनी सांगितले. पुरंदरमध्ये काॅंग्रेस आघाडीचा उमेदवार निवडून येण्यासाठी मी प्रयत्न करेन. सूनबाईंना मी काही राजकारणात सल्ला देत नाही. करमाळ्यातील स्थानिक परिस्थितीनुसार त्यांनी निर्णय घेतला असेल. 2014 मध्ये आमदार होण्याचे त्यांचे स्वप्न किरकोळ मतांनी भंगले. ते या वेळेस पूर्ण होईल, असा विश्वास असल्याचेही कोलतेंनी सांगितले.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com