दत्तात्रय भरणे : छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक ते मंत्री...

घराण्याला राजकीय वारसा नसतानाही निष्ठावान कार्यकत्यापासुन सामाजिक कामांना सुरवात करणारे आमदार दत्तात्रेय भरणे पक्षनिष्ठा,पारदर्शक कारभार व विकासकामे खेचून आणण्याची धमक असल्यामुळे श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक ते मंत्री होण्याचा बहुमान आमदार दत्तात्रेय भरणे यांना मिळाला आहे.
dattatrey bharne political career profile
dattatrey bharne political career profile

वालचंदनगर -  घराण्याला राजकीय वारसा नसतानाही निष्ठावान कार्यकत्यापासुन सामाजिक कामांना सुरवात करणारे आमदार दत्तात्रेय भरणे पक्षनिष्ठा,पारदर्शक कारभार व विकासकामे खेचून आणण्याची धमक असल्यामुळे  श्री  छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक ते मंत्री होण्याचा बहुमान आमदार दत्तात्रेय भरणे यांना मिळाला आहे. 

इंदापूरचे आमदार दत्तात्रेय भरणे शेतकरी कुंटूबातील साधे व्यक्तीमत्व म्हणून परिचित आहे. कुंटूबाला राजकारणातील  घराणेशाहीचा वारसा नाही.  केवळ पक्षनिष्ठा व विकासकामांच्या जोरावर आज मंत्रीपदापर्यंत मजल मारली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक व विश्‍वासू आमदार म्हणून त्यांची राज्यामध्ये ओळख आहे. 
१९९२ साली वयाच्या २२ व्या वर्षी भवानीनगर मधील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालकपदापासुन त्यांची सुरवात झाली. १९९६ साली पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालकपदी काम करण्याची संधी मिळाली. संचालकपदाच्या संधीचे सोने करुन शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्‍न मार्गी लावले. २००१ साली जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष होण्याचा बहुमान भरणे यांना मिळाला. यानंतर २००३ ते २००८ पर्यत भवानीनगरच्या श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची अध्यक्ष म्हणून धुरा संभाळली. 

२००९ च्या विधानसभा निवडणूकीमध्ये बंडखोरी करुन निवडणूक लढविली. मात्र निवडणूकीमध्ये थोड्या मतांनी पराभव झाला. २०१२ साली अजित पवार यांनी भरणे यांना जिल्हा परिषदेची निवडणूक लढविण्यास सांगून थेट जिल्हा परिषदेचे अध्यक्षच केले. यानंतर भरणे राजकारणामध्ये मागे वळून पाहिलेच नाही. इंदापूर तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा विकासनिधी आणून विकासकामांच्या जोरावर भरणे यांनी २०१४ ची विधानसभा निवडणूक सहज जिंकली. 

पाच वर्षामध्ये विराेधी पक्षाचा आमदार असतानाही  जिल्हामध्ये सर्वाधिक निधी खेचून आणून तालुक्याचा विकास केला. याच काळामध्ये सत्ताधारी भाजपने अनेक आमिष दाखवून पक्षामध्ये घेण्यासाठी प्रयत्न केले. मात्र या आमिषाला भरणे बळी पडले नाहीत.त्यांनी पक्षनिष्ठा सोडली नाही.  विकासाच्या जोरावर २०१९ च्या विधानसभा निवडणूकीमध्ये भरणे यांनी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचा दुसऱ्यांदा पराभव केला. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्यांना राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली असून संधीचे सोने केल्याशिवाय राहणार नाही.

नाव - दत्तात्रेय विठोबा भरणे
वय - ५०
मतदार संघ - इंदापूर
शिक्षण - पद् वीधर (बी.कॉम)
पक्ष - राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी
राजकीय कारर्किद :-
श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना संचालक - १९९२ ते
श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष- २००३ ते २००६
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक - १९९६
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष  - २००१ते २००३
पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य व  अध्यक्ष- २०१२ ते २०१४
इंदापूर तालुक्याचे आमदार - २०१४ ते २०१९
इंदापूर तालुक्याचे दुसऱ्यांदा आमदार- २०१९

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com