इंदापूरच्या  ग्रामपंचायत निवडणुकात होणार भरणे - हर्षवर्धन पाटलांचा सामना 

गेल्या दहा वर्षांपासून दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील मतदारसंघातील ग्रामपंचायत निवडणुकांपासून ते सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका अतिशय अटीतटीने लढवताना दिसत आहेत. कार्यकर्त्यांना बळ दिले तर तो विधानसभेला आपल्या गावातून नेत्याला बळ देत असतो हे सूत्र ध्यानात ठेवून दोघेही नेते प्रत्येक निवडणुकीतआपले पॅनल विजयी व्हावे यासाठी प्रयत्नशील असतात .
Fight Between Dattatray Bharne and Harshwardhan Patil in Indapur Grampanchayat Election
Fight Between Dattatray Bharne and Harshwardhan Patil in Indapur Grampanchayat Election

नीरा नरसिंहपूर  : इंदापूर तालुक्यातील पुढील जुलै ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या सुमारे 61 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे.  या निवडणुकीच्या निमित्ताने आमदार राष्ट्रवादीची आमदार दत्तात्रय भरणे आणि भाजपवासी झालेले माजी मंत्री  हर्षवर्धनपाटील यांच्यात सामना रंगणार आहे. 

गेल्या दहा वर्षांपासून  दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील मतदारसंघातील ग्रामपंचायत निवडणुकांपासून ते सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका अतिशय अटीतटीने लढवताना दिसत आहेत. कार्यकर्त्यांना बळ दिले तर तो विधानसभेला आपल्या गावातून नेत्याला बळ देत असतो हे सूत्र ध्यानात ठेवून दोघेही नेते प्रत्येक निवडणुकीत आपले पॅनल विजयी व्हावे यासाठी प्रयत्नशील असतात . 

निवडणूक आयोगाने मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या प्रभागरचना, आरक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. परिणामी गावांमधील राजकीय वातावरण आता हळूहळू तापू लागले आहे. त्यामुळे स्थानिक नेतेमंडळीनी निवडणूक मोर्चेबांधणीस सुरुवात केली असल्याचे दिसून येत आहे. या वर्षी मार्च, एप्रिलपासून जिल्ह्यात निवडणुकीची रणधुमाळी झाली. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर चार महिन्यांनी विधानसभेची निवडणूक झाली. त्यामध्ये राज्यात सत्तांतर नाट्य संपुष्टात आल्यानंतर महाविकास आघाडी सत्तेवर आली. 

अनेक वर्षे एकमेंकाविरोधात लढणारी शिवसेना आता काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचा घटक बनली आहे. त्याचा गाव पातळीवर फारसा परिणाम होणार नसला, तरी स्थानिक पातळीवरील नेत्यांनी अडचण मात्र होण्याची शक्यता आहे. इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी, पुर्वीची काँग्रेस व आताची भाजप यांच्यात निवडणूकीत नेहमी चुरस पाहायला मिळते. मात्र या वेळी कोणती भूमिका स्थानिक नेते घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

जिल्ह्यात अवघ्या आठ ते नऊ महिन्यांवर येऊन ठेपलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत स्थानिक प्रश्नांची फक्त चर्चा दिसण्याची शक्यता आहे. त्यातच पाच वर्षांत रखडलेले स्थानिक प्रश्न, विकासकामे, गटातटाचे राजकारण, विकासनिधीचे वाटप अशा विविध कारणांमुळे स्थानिक राजकारण उफाळून येणार आहेत.

प्रत्येक गावांत दोन ते तीन गट सक्रिय आहेत. त्यात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप अशा विविध पक्षांची विचारधारा असलेले गट गाव पातळीवर आहेत. त्यामुळे काही नेते सोयीचे राजकारण म्हणून प्रस्थापित, विरोधकांच्या वळचणीला जातात त्यातून चुरशीची लढत पाहावयास मिळणार आहे. विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या गटातच चुरशीची निवडणूक पहावयास मिळणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com