मी शो करणारा नेता नाही : सत्कारात भरणे यांचा हर्षवर्धन यांना टोला

...
bharane-ajit-pawar
bharane-ajit-pawar

इंदापूर : इंदापूर तालुक्याचा आमदार म्हणून मंत्रिमंडळात माझा समावेश होऊन मला सहा खाती मिळाली. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच काँगेसचे अशोक चव्हाण यांच्यासह मंत्रीमंडळातील सर्व खाती आपली असूनतालुक्याचे प्रलंबित प्रश्न सोडविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. हे प्रश्न मी अगोदर सोडविणार व त्यानंतर मी यासंदर्भात बोलणार आहे. कुठल्याही गोष्टींचा शो करण्याचा आपला स्वभाव नसून आपण जनसेवक म्हणून राज्यभर कार्यरत राहू, अशी ग्वाही नूतन जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्य मंत्री दत्तात्रय भरणे, इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती यशवंत माने हे मोहोळ विधानसभेचे आमदार म्हणून विजयी झाल्याबद्धल तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर यांनी जिल्ह्यात सर्वाधिक आमदार निवडून आणल्या बद्दल त्यांचा तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील,कार्याध्यक्ष अमोल भिसे, महिलातालुकाध्यक्ष छाया पडसळकर , इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शिवाजीराव इजगुडे, नगरसेवक अनिकेत वाघ तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला.

यावेळी बारामती प्रांता- धिकारी दादासाहेब कांबळे व तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी स्वतंत्रपणे मंत्री भरणे यांचा सत्कार केला. तत्पूर्वी श्रीराम चौक, मुख्य बाजार पेठ, छत्रपती शिवाजी चौक अशी जीपमधून मंत्रीभरणे, आमदार माने, जिल्हाध्यक्ष गारटकर यांची  मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मंत्री भरणे यांनी सर्वाना अभिवादन करून आभार मानले.

मंत्री भरणे पुढे म्हणाले, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर यांनी ठेवलेला विश्वास सार्थ करून दाखवू. आपले तीन पक्षाचे सरकार असल्याने आपण बेरजेचे राजकारण करू. राज्याची जबाबदारी असताना देखील तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध राहू.

आमदार यशवंत माने म्हणाले, ``विरोधी पक्षाचा आमदार घडताना दत्तात्रय भरणे यांनी 1352 कोटी रुपयांचा निधी तालुक्यासाठी आणला. आता आपण सत्तेत आहे त्यामुळे मोहोळ तालुक्याच्या विकासासाठी नक्की 3 हजार कोटी रुपयांचा निधी मिळेल. आपण इंदापूर तालुक्याच्या ऋणात राहू.

यावेळी प्रदिप गारटकर यांनी कर्मयोगी कारखाना निवडणूक पक्षाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय देण्याचे सूतोवाच केले तर सोनाई परिवाराचे अध्यक्ष दशरथ माने यांनी तालुक्याचे पक्षाचे मोठे नेते सोडून गेले असताना देखील 80 वर्षाचे तरुण नेते शरद पवार यांच्यामुळे विजय मिळवून दत्तात्रय भरणे मंत्री झाल्याने इंदापुरच्या सन्मान वाढल्याचे सांगितले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com