दत्ता दळवींना शिवसैनिकांची नाराजी भोवणार?

दत्ता दळवींना शिवसैनिकांची नाराजी भोवणार?

कर्जत : शिवसेनेचे कर्जत, पनवेल आणि उरण येथील संपर्कप्रमुख दत्ता दळवी आता शिवसैनिकांच्या  रडारवर आहेत. संपर्काचा अभाव आणि गटबाजीवर तोडगा काढण्यात येत असलेले अपयश या त्यांच्या विषयीच्या तक्रारी असल्याचे बोलले जात आहे . 

दळवी यांच्याकडे कर्जत, पनवेल, उरण अशा तीन मतदारसंघाची जबाबदारी आहे . मात्र ते संपर्कप्रमुख झाल्यापासून  फारसे या मतदारसंघात फिरताना दिसून येत नाहीत. फक्त सेनेचा कार्यक्रम असेल तेव्हा त्या कार्यक्रमाला  हजेरी लावतात.  पक्षाची संघटना बांधणी करणे गरजेचे असताना तसे होताना दिसून येत नाही. त्यामुळे रायगडचे संपर्क प्रमुख असून नसल्यासारखे असल्याची शिवसैनिकांची भावना  आहे . या आधीचे संपर्कप्रमुख  संजय मोरे आणि आदेश बांदेकर यांनाही अशाच तक्रारींमुळे  संपर्कप्रमुखपदावरून पायउतार व्हावे लागले.

सध्या कर्जत मतदारसंघात शिवसेनेमध्ये कमालीची गटबाजी आहे. कर्जत मतदारसंघात सेनेच्या काही नेत्यांनी खासदार बारणे यांना मदत केली नसल्याचा आरोप आहे.   त्यांच्यावर कारवाई करणे अपेक्षित असताना  संपर्कप्रमुख त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप केला जात आहे.  आता अशा नेत्यांना संघटनेत  पदे देण्याचाही  घाट घेतला जात असल्याचे  सेनेच्या एका नेत्याने  नांव न सांगण्याच्या  अटीवर सांगितले. 

खासदार श्रीरंग बारणे यांना  मदत करणारा आणि मदत न करणारा असे दोन गट कर्जत गट पडले आहेत . त्यामुळे सेनेत वातावरण  दूषित झाले असताना संपर्कप्रमुखांनी यावर ठाम भूमिका घेण्याचे टाळले असल्याचे शिवसैनिकांचे म्हणणे आहे.  अगोदरच गटबाजीच्या विळख्यात असलेल्या  कर्जत मतदारसंघातील शिवसैनिकांच्या या नव्या नाराजीकडे  पक्षातील नेते कसे पाहतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे . 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com