वीस वर्षात न झालेला विकास पाच वर्षात करतो : दत्ता गोर्डे

Gorde paithan
Gorde paithan

पैठण: तालुक्‍याच विकास होईल म्हणून तुम्ही वीस वर्ष सत्ता दिली, पण विकास काही झाला नाही. आता पुढची पाच वर्ष मला संधी द्या, तुमचा विकास केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही पैठण विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस महाआघाडीचे उमेदवार दत्ता गोर्डे यांनी दिली.

विधानसभा निवडणुकी निमित्त विविध गावातील मतदारांच्या भेटी दरम्यान घेण्यात आलेल्या प्रचार बैठका व सभा मधून ते विरोधकांवर टिका आणि आपल्याला संधी देण्याचे आवाहन करत आहेत. गोर्डे म्हणाले, चुकीचे नेतृत्व निवडुन दिल्यामुळे तालुक्‍याचा विकास गायब झाला. आता निवडणुकीत पुन्हा तुम्हाला मते मागण्यासाठी सत्त्ताधारी नेते मंडळी येत आहे. या नेत्यांना तुम्ही कधी विधानसभेच्या हिवाळी, पावसाळी व अर्थसंकल्पाच्या अधिवेशनात एक तरी प्रश्न मांडुन एखादी विकासाची योजना आणल्याचे एकले का?

सत्ताधाऱ्यांच्या काळात संत एकनाथ व शरद सहकारी साखर कारखान्यातील बेजबाबदार कारभारामुळे तालुक्‍यातील शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला . निवडणुकीत खोटी आश्वासने देवुन दोन्ही साखर कारखाने ताब्यात घेवुन भाड्याने देणे हाच विकास त्यांनी केला आहे. त्यामुळे विकासाच्या प्रश्नांवर बोलण्याची हिंमत त्यांच्यात नाही. केवळ विकास केल्याचा आव आणून ते लोकांची दिशाभूल करत असल्याची टिकाही दत्ता गोर्डे यांनी प्रचारा दरम्यान केली.

जनतेचा उद्रेक होईल

यापुढील काळात गतिमान विकासातुन तालुका सर्वोत्तम बनविण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हाच एकमेव पर्याय आहे. जनतेनेच ही निवडणुक आता हाती घेतल्यामुळे आपला विजय निश्‍चित असल्याचा विश्‍वास देखील गोर्डे यांनी व्यक्त केला. मी शेतकरी कुटुंबात जन्म घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कष्टांची आणि व्यथांची मला चांगली जाणिव आहे.


शेतकऱ्यांसह गोरगरीब जनतेचे अश्रु पुसण्यासाठी मी निवडणुक रिंगणात उतरलो आहे. जनतेचे हित ज्याच्यात आहे त्यालाच प्राधान्य देण्याची भुमिका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते शरद पवार, अजित पवार यांनी घेतली आहे. गेल्या वीस वर्षात जनतेने जे भोगले त्याचा उद्रेक या निवडणुकीत झाल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देखील गोर्डे यांनी विरोधकांना दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com