सत्ताधारी आमदारांना विकासाचे वावडे - दत्ता गोर्डे

  सत्ताधारी आमदारांना विकासाचे वावडे - दत्ता गोर्डे

पैठण : गेल्या वीस वर्षांत पैठण तालुक्‍यातील सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी आपल्या पक्षातील कर्तबगार कार्यकर्त्यांचा बळी घेवून विरोधकांना सोईचे होईल असेच राजकारण केले. त्यांना विकासाचे वावडे आहे असा टोला पैठण विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी-कॉंग्रेस महाआघाडीचे उमेदवार दत्ता गोर्डे यांनी शिवसेना आमदार संदीपान भुमरे यांचे नाव न घेता लगावला. 

निवडणुक प्रचारा निमित्त आपतगाव, आंतरवाली खांडी, भालगाव येथे घेण्यात आलेल्या प्रचार सभा आणि कॉर्नर बैठकातून दत्ता गोर्डे सत्ताधारी आमदारांवर टिकेची झोड उठवत आहेत. गोर्डे म्हणाले, सत्तेच्या खुर्चीवर ज्यांना तुम्ही बसविले आहे, त्यांना विकासाचे वावडे आहे. त्यामुळे आणखी कितीवेळा त्यांना निवडूण देणार याचा विचार करण्याची वेळ आली आहे. मतदारांनी पुन्हा तीच चूक केली तर तालुक्‍याचा विकास कधीच होणार नाही आणि पैठण विकासापासून कोसो दुर राहील. मतदार संघात अविचाराचे राजकारण सुरु असून प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम सत्ताधारी नेतृत्व करीत आहे. पण आता त्यांचा हा प्रकार पक्षातील कार्यकर्त्यांच्या लक्षात आला आहे. त्यामुळे हे कार्यकर्तेच त्यांना आता निवडणुकीत धडा शिकविणार आहेत. 

आज तालुक्‍यात विकासाच्या योजना कुठेच दिसत नाही. सत्ताधाऱ्यांच्या ताब्यात असलेल्या संस्थामध्ये सुरू असलेल्या गलथान कारभारामुळे सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांचे वाटोळं झाल्याचा आरोप देखील गोर्डे यांनी केला. शेतकरी विरोधी असलेले सत्ताधारी आमदार आणि हे सरकार घालविण्यासाठी सगळ्यांनी एकजूट दाखवावी आणि राज्यात पुन्हा राष्ट्रवादी-कॉंग्रेस आघाडीचे सरकार आणावे असे आवाहन देखील दत्ता गोर्डे यांनी यावेळी केले. 

मी या निवडणुकीत जनतेच्या हितासाठी दंड थोपटले आहेत. ही निवडणुक सामान्य कार्यकर्त्यांनी हाती घेतल्यामुळे आम्हाला विजयाची खात्री आहे. विरोधकांचा असा पराभव करा की पुन्हा भविष्यात ते दिसता कामा नये. विरोधकांचे समुळ उच्चाटन करण्याचा विचार राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी केला आहे. त्यामुळे मतदारांची साथच हा बदल घडवु शकते असा विश्‍वास देखील गोर्डे यांनी व्यक्त केला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com