Darshan Thakur of MahaVikas Aghadi Became Deputy Sarpanch of Panvel | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

साताऱ्यात गुरूवारी मध्यरात्रीपासून सात दिवस कडक लॉकडाउन करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरित सर्वकाही बंद राहणार आहे.

पनवेलमध्ये महाविकास आघाडीचा पहिला उपसरपंच; दर्शन ठाकूर यांच्या गळ्यात उपसरपंचाची माळ

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 11 डिसेंबर 2019

तालुक्‍यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून गणल्या जाणाऱ्या नेरे ग्रामपंचायतीत 11 सदस्य असून शेकाप, कॉग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेस आणि मनसेचे मिळून 8 सदस्य आहेत. तसेच भाजपचे 3 सदस्य निवडून आले आहेत. या पूर्वी उपसरपंच म्हणून निवडून आलेले सुनील पाटील यांनी राजीनामा दिल्याने ग्रुपग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक झाली

पनवेल : तालुक्‍यातील नेरे ग्रामपंचायतीचे उपसरपंच म्हणून राष्ट्रवादीचे विधानसभा युवा अध्यक्ष दर्शन ठाकूर यांची मंगळवारी (ता.10) बिनविरोध निवड करण्यात आली आहे. राज्यात नव्याने निर्माण झालेल्या महाविकास आघाडीचा तालुका निवडणुकीतील पहिला प्रयोग नेरे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत यशस्वी झाल्याने ठाकूर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

तालुक्‍यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून गणल्या जाणाऱ्या नेरे ग्रामपंचायतीत 11 सदस्य असून शेकाप, कॉग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेस आणि मनसेचे मिळून 8 सदस्य आहेत. तसेच भाजपचे 3 सदस्य निवडून आले आहेत. या पूर्वी उपसरपंच म्हणून निवडून आलेले सुनील पाटील यांनी राजीनामा दिल्याने ग्रुपग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाच्या रिक्त असलेल्या जागेकरिता मंगळवारी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडी तर्फे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे विधानसभा युवा अध्यक्ष दर्शन ठाकूर यांचा एकमेव अर्ज आल्याने ठाकूर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 

या निवडणुकीत ग्रामसेवक दत्तात्रेय पाटील यांनी पीठासन अधिकारी म्हणून काम पहिले. या वेळी सरपंच राजश्री म्हसकर, ग्रामपंचायत सदस्य शंकर ठाकूर, सुनील पाटील, प्रज्ञा कलोते, सुप्रिया मांडवकर, दीपाली रोडपालकर, रसिका पाटील, सुमन वाघे आदी सदस्य उपस्थित होते. त्याचबरोबर नवनिर्वाचित उपसरपंच दर्शन ठाकूर यांचे अभिनंदन करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पनवेल विधानसभा अध्यक्ष व नगरसेवक सतीश पाटील, माजी नगरसेवक सुनील घरत, संतोष पाटील, विलास फडके, यशवंत जाधव, भास्कर कलोते आदी उपस्थित होते.

राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, व शिवसेना या तीन पक्षाच्या महाविकास आघाडीची सत्ता आता महाराष्ट्रात असल्याने पनवेलमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे विकास पाहायला मिळणार आहे. महाविकास आघाडीचा पहिल्या उमेदवाराची नोंद पनवेल तालुक्‍यातील नेरे ग्रामपंचायतीचे उपसरपंचपदाची झाली आहे - सतीश पाटील - नगरसेवक, पनवेल विधानसभा जिल्ह्याध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख