संजय काकडे भाजपाचे सदस्य नाहीत; ते तर सहयोगी आहेत - रावसाहेब दानवे

संजय काकडे भाजपाचे सदस्य नाहीत; ते तर सहयोगी आहेत - रावसाहेब दानवे

पुणे : खासदार संजय काकडे हे भारतीय जनता पार्टीचे सदस्य नाहीत. ते राज्यसभेतील सहयोगी सदस्य आहेत. त्यामुळे त्यांनी काय बोलावे हा त्यांचा प्रश्‍न आहे. पक्षाच्या सदस्यावर मात्र, पक्षाचे नियंत्रण आहे. या शब्दात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज भूमिका स्पष्ट केली. खासदार काकडे सध्या पक्षाच्या संदर्भाने कोणतेही वक्तव्य करताना दिसत नाहीत. लोकसभा निवडणुकीपासून पुणे शहरात ते सक्रिय दिसत नाहीत, या प्रश्‍नावर दानवे यांनी वरील स्पष्टीकरण दिले. माझ्या निवडणुकीच्या संदर्भानेदेखील काकडे यांनी निवडणुकीच्या काळात वक्तव्य केले होते. मात्र. त्याचा कोणताही विपरीत परिणाम निकालावर झाला नाही. मी तब्बल साडेतीन लाख मतांच्या फरकाने निवडून आलो. त्यामुळे खासदार काकडे काय बोलतात यावर प्रदेशाध्यक्ष म्हणून मी काही बोलण्याची गरज नाही. ते पक्षाचे सदस्य असते तर गोष्ट वेगळी होती, असे दानवे यांनी स्पष्ट केले. 

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांनी मला पूर्ण मदत केली. त्यामुळे मोठ्या मताधिक्‍याने निवडून येणे शक्‍य झाले. येत्या विधानसभा निवडणुकीत खोतकर यांना पूर्ण क्षमतेने मदत करणार असल्याचे सांगत खोतकर हे माझे चांगले मित्र आहेत, असे दानवे यांनी स्पष्ट केले. जनसंघाचे संस्थापक शामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंती निमित्ताने सदस्यता नोंदणी मोहीम सुरू करण्यात आली असून येत्या 11 ऑगस्टपर्यंत ही मोहीम चालेल, असे दानवे यांनी सांगितले. गेल्या वेळी राज्यात एक कोटी सात लाख सदस्यांची नोंदणी झाली होती. यावेळी त्यात 20 टक्के वाढ करण्याचे उद्दीष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com