आज बाळासाहेब असते तर, असे घडले नसते - रावसाहेब दानवे

 आज बाळासाहेब असते तर, असे घडले नसते - रावसाहेब दानवे

औरंगाबाद : राज्यात भाजप-शिवसेना एकत्र निवडणूक लढली, जनतेनेही युतीला महाजनादेश दिला. मात्र निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी यांनी पत्रकार परिषद घेत आम्हाला सर्व पर्याय खुले असल्याचे सांगितले. खर तर सत्ता स्थापनेसाठी जनतेने बहुमत दिले होते. पण ठाकरे यांनी भाजप नेत्यांचे फोन न घेता "आम्हाला मुख्यमंत्री पद देणार असेल तर बोला' असे म्हणत अडून बसले. आज बाळासाहेब असते तर असे घडलेच नसते अशा शब्दांत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्यतील सद्य राजकीय परिस्थीतीवर भाष्य केले. 

राज्यातील सत्ता-स्थापनेवरून युतीत बिनसले आहे. शिवसेनेने राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस बरोबर जाण्याचा हालचाली सुरु केल्या आहेत. तर दुसरीकडे भाजपही सत्ता स्थापनेच्या तयारीला लागल्याची चर्चा आहे. या पार्श्‍वभूमीवर रावसाहेब दानवे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दानवे म्हणाले, 1995 मध्ये राज्यात युतीचे सरकार सत्तारूढ झाले होते. त्यावेळी युतीचे जनक असलेले बाळसाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांनी ज्या पक्षाचे आमदार जास्त त्या पक्षाचा मुख्यमंत्री असा फॉर्म्युला ठरवला होता. त्यानुसारच मनोहर जोशी व नारायण राणे मुख्यमंत्री झाले होते आणि भाजपचा उपमुख्यमंत्री होता. जे सूत्र बाळासाहेब आणि महाजनांनी ठरवून दिले, त्याचीच अंमलबजावणी भाजप-शिवसेनेने करावी आणि जनमतचा आदर करावा असे आवाहन करतांनाच बाळासाहेब असते तर असे घडलेच नसते असा चिमटाही दानवे यांनी शिवसेनेला काढला. 

फडणवीसांच्या नेतृत्वात बदल नाही 
"मी पुन्हा येईल' या वाक्‍यामुळे शिवसेनेने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला विरोध केला का? या प्रश्‍नावर दानवे म्हणाले, राज्यात पाच वर्षात जी विकास कामे झाली, जे संकटे आली ते यशस्वीरित्या हातळाण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केले. यात दोन वेळा दुष्काळ पडला. शेतकऱ्यांचे आंदोलन झाले, मराठा ,धनगर समाजाचे आंदोलन झाले. अशा सगळ्या परिस्थितीतीला मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांनी योग्य पध्दतीने सामोरे गेले, ती हाताळली. त्यामूळे नेतृत्व बदलाचा विषयच येत नाही. कोणी कितीही काही म्हटले तरी फडणवीस यांचे नेतृत्व बदलले जाणार नाही. असा दावा देखील दानवे यांनी केला. रखडलेल्या रस्त्यांच्या कामावरून काळजी करू नका सरकार आमचे येणार आहे, निधी उपलब्ध करून सगळी कामे पूर्ण करू असे सांगत त्यांनी या विषयाला बगल दिली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com