सत्तार समर्थकांकडून फटाके फोडून दानवेंच्या विजयाचा जल्लोष

सत्तार समर्थकांकडून फटाके फोडून दानवेंच्या विजयाचा जल्लोष

औरंगाबाद : महायुतीचे अंबादास दानवे यांच्या विजयात किंगमेकरची भूमिका निभावणारे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या समर्थकांकडून त्यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. सत्तार बाहेरगावी असल्यामुळे त्यांच्यावतीने चिरंजीव समीर सत्तार यांनी औरंगाबाद येथे आमदार अंबादास दानवे यांचा सत्कार आणि अभिनंदन केले. 

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत अब्दुल सत्तार यांनी कॉंग्रेस-आघाडीची सव्वाशेहून अधिक मते वळवल्याचा दावा केला जातोय. ही सगळी मते सत्तार यांनी अंबादास दानवे यांच्यासाठी वळवल्याचे बोलले जाते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर एकप्रकारे सत्तार यांनी आपली शक्ती तपासून पाहिल्याची देखील चर्चा या निमित्ताने सुरू आहे. महायुतीसाठी त्यांनी आखलेली रणनीती कमालीची यशस्वी ठरल्यामुळे अंबादास दानवे यांच्या विजयाचा सर्वाधिक आनंद देखील अब्दुल सत्तार आणि त्यांच्या समर्थकांना झाल्याचे दिसते. दुपारी अकरा वाजता अंबादास दानवे यांचा विजय झाल्याचे स्पष्ट होताच सत्तार समर्थकांनी संपर्क कार्यालया बाहेर जोरदार फटाक्‍यांची आतषबाजी केली. यावेळी कार्यकर्त्यांनी अब्दुल सत्तार यांचा जयघोष देखील केला. 

दरम्यान, अब्दुल सत्तार आज शहराबाहेर होते, त्यामुळे त्यांनी अंबादास दानवे यांचे फोनवरून अभिनंदन केले. तर त्यांच्या वतीने समीर सत्तार, सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे अर्जुन गाढे पाटील आदींनी औरंगाबादला येऊन अंबादास दानवे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com