लोकसभेवेळच्या पराभवामुळे चंद्रकांत खैरे काहीही बरळत आहेत - रावसाहेब दानवे

........
 लोकसभेवेळच्या पराभवामुळे चंद्रकांत खैरे काहीही बरळत आहेत - रावसाहेब दानवे

नाशिक : एक पक्षाचा नेता दुसऱ्या पक्षाच्या नेत्याला भेटला म्हणजे युती होईलच असे नाही या शब्दांत भाजप नेते, खासदार रावसाहेब दानवे यांनी "मनसे'शी युतीचा विषय निकाली काढला. राज्यातील सरकारवर टिका करीत हे अमर अकबर अँथोनी सरकार फार काळ चालणारच नाही, याची मला खात्री आहे असा दावा त्यांनी आज येथे केला. 

खासदार दानवे यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतांना "सीएए' विषयावर केंद्र सरकारची बाजु लढवली. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दानवे यांनी जमिन बळकावल्याचा आरोप केला आहे. त्याबाबत विचारले असता, ते म्हणाले, मी राजूर संस्थानचा सेक्रेटरी आहे. खैरे यांनी माझं नाव घेऊन आरोप करावेत. कोणती जमीन मी बळकावली हे सिद्ध करुन दाखवावे. लोकसभा निवडणूकीत पराभव झाल्याने खैरे काहीही बरळत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजाचा प्रश्‍न उपस्थित करुन जनतेची दिशाभूल करु नये, असे सांगून त्यांनी मुख्यमंत्र्यांवरही टीका केली. मुख्यमंत्र्यांनी तहसीलदाराला खुर्चीत बसवले, यावर ते म्हणाले, तहसीलदाराला खुर्चीत बसवल्याने कामे होत नाहीत. आपण आपल्या खुर्चीवर बसून त्यांच्याकडून कामे करुन घ्यायची असतात. त्याच्याकडून काम करुन घ्यायचे असते. हे अद्याप त्यांना उमजलेले नाही. 

खासदार दानवे म्हणाले, केंद्र सरकारने "सीएए' हा नागरिकत्व देण्यासाठीचा कायदा केला आहे. नागरिकत्व हिसकावण्यासाठी केलेला नाही. विरोधक याबाबद गैरसमज पसरवत आहेत. जनतेला लवकरच ते कळेल. उद्या मी काश्‍मीरला जाणार आहे. तेथील जनतेशी संवाद साधेन. त्यांच्या समस्या समजून घेऊन केंद्र सरकारला कळवेन. सरकारच्या ज्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या नाहीत त्या पोहोचविण्याचे काम आम्ही सुरु केले आहे. त्याचे निराकरण होईल असा मला विश्‍वास आहे. दानवे यांच्या दौऱ्याच्या पूर्वसंध्येला पक्षाच्या अल्पसंख्यांक आघाडीच्या बावीस महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी 'सीएए' विषयावरुन राजीनामे दिले. याविषयी त्यांनी आपल्याला त्याची माहिती नाही. मात्र आमच्या पक्षातील मुस्लीम कार्यकर्त्यांनाही 'सीएए' कायदा काय आहे हे समजून सांगावे लागले. ते लवकरच करु. पाकिस्तानमध्ये 3 टक्के तर बांगलादेशमध्ये 7 टक्के हिंदू आहेत. अफगाणिस्तानसह हे तिन्ही देश मुस्लिम आहेत. तेथील अल्पसंख्यांक हिंदूच्या समस्या समजून घेतल्या पाहिजेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com