जालन्यात रावसाहेब दानवे आघाडीवर

 जालन्यात रावसाहेब दानवे आघाडीवर

जालना : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी चौथ्या फेरीअखेर लक्षणीय आघाडी घेतली आहे. जालना लोकसभा मतदारसंघात चौथ्या फेरीअखेर रावसाहेब दानवे यांना 1लाख 22 हजार 588 मते मिळाली तर कॉंग्रेसच्या विलास औताडे यांना 53292 इतकी मते मिळाली आहेत. 

याच मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडी चे उमेदवार डॉ.शरदचंद्र वानखेडे यांना 12904 मते मिळाली आहेत तर दानवे (भाजप) यांना 69,296 मताची आघाडी मिळाली आहे. या मतदारसंघातील लढत निवडणूक जाहीर झाल्यापासून लक्ष वेधणारी ठरली होती. खोतकर आणि सत्तार यांनी सुरवातीला दानवे यांना विरोध केला होता, त्यांनी नंतर मदत केली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com