'दंगल' फेम कुस्ती प्रशिक्षक महावीर फोगाट राजकारणात

दंगल चित्रपटात अमिर खानने ज्यांची भूमिका केली होती ते प्रसिद्ध कुस्ती प्रशिक्षक महावीर फोगाट हरियानाच्या राजकारणात सक्रिय झाले आहेत.
Mahavir-Phogat
Mahavir-Phogat

चंडीगड :  दंगल चित्रपटात अमिर खानने ज्यांची भूमिका केली होती ते प्रसिद्ध कुस्ती प्रशिक्षक महावीर फोगाट हरियानाच्या राजकारणात सक्रिय झाले आहेत.

ओमप्रकाश चौटाला यांचे नातू दुष्यंत चौटाला यांच्या जननायक जनता पार्टी (जेजेपी) मध्ये महावीर फोगाट सहभागी झाले आहेत. पक्षाच्या क्रीडा विभागाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून महावीर फोगाट यांची नियुक्ती झाली आहे.

महावीर फोगाट हे आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू गीता फोगाट व बबिता फोगाट यांचे वडील आहेत. चार मुलींचे वडील असलेल्या महावीर फोगाट यांना आपल्या मुलींना आंतरराष्ट्रीय स्तरावर कुस्ती खेळवण्याची इच्छा होती. हरियाना सारख्या महिलांच्या बाबतीत अतिशय नकारात्मक दृष्टिकोन असलेल्या राज्यात महावीर फोगाट यांना अत्यंत प्रतिकुलतेला सामोरे जावे लागले होते.

 अशाही परिस्थितीत त्यांनी आपल्या मुलींना राष्ट्रीय स्तरावरच नव्हे तर ऑलिंपिक पर्यंत नेले आणि देशावर पदकांचा वर्षाव केला होता. त्यांच्या जीवनावर अमिर खानने दंगल हा काढला होता. हा सिनेमा देखील खूप गाजला.  मुलींच्या दैदिप्यमान यशाने महावीर फोगाट यांचे नाव घराघरापर्यंत जाऊन पोहोचले. 

ओमप्रकाश  चौटाला यांनी आपले नातू दुष्यंत चौटाला यांना इंडियन नॅशनल लोकदल पक्षातून नोव्हेंबर महिन्यात बाहेर काढले होते . त्यानंतर दुष्यंत चौटाला यांनी जननायक जनता पार्टी (जेजेपी ) ची स्थापना केली आहे . या पक्षाच्या घोषणेसाठी दुष्यंत चौटाला यांनी घेतलेल्या मेळाव्यास सहा लाख लोक उपस्थित होते . 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com