दानवेंकडून पुणे भाजप पदाधिकाऱ्यांची झाडाझडती

दानवेंकडून पुणे भाजप पदाधिकाऱ्यांची झाडाझडती

पुणे : विस्तारकांची नावे तातडीने कळविली पाहिजेत तसेच बूथ समित्या व मंडलनिहाय कार्यकारिणी तातडीने का होत नाहीत, असा प्रश्‍न विचारत प्रदेश पातळीवरून देण्यात आलेले कार्यक्रम वेगाने मार्गी लागले पाहिजेत, असे सांगत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पुण्यातील पदाधिकाऱ्यांची बंद दाराआड आज झाडाझडती घेतली. 

पुणे व पिंपरीतील पक्ष संघटनेच्या कामाचा आढावा आज दोन स्वतंत्र बैठकात दानवे यांनी घेतला. पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासह खासदार अनिल शिरोळे, संजय काकडे तसेच आमदार व पुण्यातील पक्षाच्या शहर कार्यकारिणीचे सर्व सदस्यांना या बैठकीला बोलविण्यात आले होते. 

पक्षाच्यावतीने नेमण्यात आलेले विस्तारक आणि बूथ समित्यांच्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. काही मतदारसंघात अद्याप बूथ समित्यांचे, तसेच पक्षाच्या विविध आघाड्यांची कार्यकारिणी पूर्णपणे स्थापन झालेल्या नाहीत हे लक्षात आले. त्यावरून दानवे यांनी काम वेळेत पूर्ण झाले पाहिजे, असे सांगत वेळ घालवून चालणार नाही. ज्यांचे काम अपूर्ण आहे अशा पदाधिकाऱ्यांना वैयक्तिक सूचना दिल्या. संघटनात्मक पातळीवरील नेमणूका तसेच निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून बूथ समित्यांचे काम गांभीर्याने पूर्ण करण्याचे शहराध्यक्ष गोगावले यांना सांगितले. 

पुण्यातील आठ विधानसभा मतदारसंघात प्रत्येक मतदारसंघात एक विस्तारक नेमण्यात आला आहे. या विस्तारकाच्या निरीक्षणाखाली बूथनिहाय 20 सदस्यांची एक समिती बनविण्यात येत आहे. पुण्यात सुमारे दोन हजार 600 बूथ आहेत. यात आणखी भर पडून ही संख्या तीन हजारापर्यंत जाईल. मात्र काम तातडीने मार्गी लागले पाहिजे हाच दानवे यांचा आग्रह होता. बूथनिहाय समित्यांचे काम 40 टक्के काम पुण्यात अद्याप अपूर्ण आहे.  

 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com