danave criticizes anil gote | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

भाजपची चौकट मोडणारे आमचे नाहीत : गोटेंना उद्देशून दानवे कडाडले

निखिल सूर्यवंशी
रविवार, 11 नोव्हेंबर 2018

धुळे : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपतर्फे जे. बी. रोडवर शनिवारी रात्री साडेआठनंतर झालेल्या विजय संकल्प मेळाव्यात आमदार अनिल गोटे आणि तीन मंत्री, प्रदेशाध्यक्षांसह एकमेकांच्या समर्थकांमध्ये टोकाचा वाद झाला. तो निवळल्यावर पुन्हा सुरू झालेल्या सभेत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी भाजपची चौकट, आचारसंहिता मोडणारे आमचे नाहीत, असा दावा केला.

तर चौकट, आचारसंहिता पाळणारेच आमचे आहेत, अशा खोचक शब्दांत आमदार गोटे यांना टोला लगावला. याच भूमिकेचा पुनरूच्चार त्यांनी आज (रविवारी) नंदुरबार येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केला. 

मेळाव्याला निवडणूक प्रभारी तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन, संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, रोहयो व पर्यटनमंत्री जयकुमार रावल, आमदार स्मिता वाघ, शहर- जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल आदी उपस्थित होते. 

प्रदेशाध्यक्ष दानवे म्हणाले, की महापालिका निवडणुकीत कुणीही आडवे आले तर त्यांना आडवे पाडूनच, मुंडक्यावर पाय ठेऊन सत्ता मिळवू. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. गुंडगिरी मोडीत काढण्याची ताकद भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. शहराच्या विकासाला खीळ घालणाऱ्या विरोधी पक्षांना मतदारांनी जागा दाखवावी. शहर, राज्य, केंद्रात भाजपची सत्ता आहे. महापालिकेत ती नाही. ती प्राप्त होण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. मी आमदार, खासदार, मंत्री होतो. प्रदेशाध्यक्ष आहे. भाजपचा कार्यकर्ता असल्याने पद मिळाले, असे सांगत नगरसेवकापासून आमदारापर्यंत प्रत्येकाने पक्षाची चौकट, आचारसंहिता पाळली पाहिजे. वागण्याची एक पद्धत असते. पक्षाची चौकट, आचारसंहिता पाळली जात नसेल तर तो आमचा (भाजप) नाही, पाळली जात असेल तर आमचा आहे, असे टोला श्री. दानवे यांनी आमदार गोटे यांना उद्देशून लगावला. 

गुंडगिरी मोडीत काढू 

धुळेकरांनी डगमगू नये. गुंडगिरी मोडीत काढू. त्यासाठी राज्य शासन धुळेकरांच्या खंबीरपणे पाठीशी राहील. धुळे शहरातील समस्या पाहता महापालिकेत भाजपला सत्ता देऊन विकासाचा मार्ग मतदारांनी खुला करावा. प्रदेशाध्यक्ष म्हणून धुळे शहराच्या विकासासाठी तीनशे कोटींचा निधी मिळवून देऊ. या घोषणेसाठी मुख्यमंत्र्यांना येथे घेऊन येऊ, श्री. दानवे यांनी सांगितले. तत्पूर्वी, मंत्री महाजन यांनी शहरात आजही आठ ते दहा दिवस पिण्याचे पाणी मिळत नसल्याबद्दल चिंता व्यक्त केली. यासह विविध समस्यांतून बाहेर निघण्यासाठी भाजपला सत्ता द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख