भाजपने खुशाल स्वबळावर लढावे, शिवसेना आपली ताकद दाखवून देईल - अंबादास दानवे

 भाजपने खुशाल स्वबळावर लढावे, शिवसेना आपली ताकद दाखवून देईल - अंबादास दानवे

औरंगाबाद : आगामी महापालिका निवडणूक भाजपने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. त्यांनी खुशाल स्वतंत्रपणे लढावे शिवसेना देखील आपली ताकद दाखवून देईल असा इशारा शिवसेना आमदार तथा जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी भाजपला दिला. महापालिकेत भाजपच्या नगरसेवकांनी राज्यात शिवसेनेने अभद्र युती केल्याचा आरोप करत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अभिनंदन ठरावाला विरोध केला. तसेच जनता आम्हाला जाब विचारत असल्याचे सांगत भाजपचे उपमहापौर विजय औताडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा महापालिका आयुक्तांकडे दिला. या घटनेमुळे शहरातील राजकारण पुन्हा ढवळून निघाले आहे. 

या पार्श्‍वभूमीवर आमदार अंबादास दानवे यांनी सरकारनामाशी बोलतांना आपली भूमिका स्पष्ट केली. दानवे म्हणाले, जनादेश वगैरे भाजपने आम्हाला शिकवू नये, बिहार, कर्नाटक आणि देशातील अन्य राज्यांमध्ये जनादेशाची त्यांनी कशी वाट लावली हे सगळ्यांनी पाहिले आहे. तेव्हा भाजपने तत्वाच्या गप्पा मारू नयेत. उपमहापौरांनी राजीनामा दिला त्याबद्दल मला त्यांना एवढंच सांगायच की, तुम्ही आणि भाजपचे सगळेच नगरसेवक हे युतीचे म्हणून निवडून आलेले आहात. त्यामुळे उपमहापौर पदाचाच नाही तर त्यांनी नगरसेवक पदाचाही राजीनामा दिला पाहिजे, तरच ते तत्वाला धरून असेल. 

शिवसेना महाआघाडी करून लढणार.. 
भाजपने स्वबळावर महापालिका निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे, त्यांना माझ्या शुभेच्छा. शिवसेना मात्र महाआघाडीला सोबत घेऊन ही निवडणूका लढणार आहे असेही अंबादास दानवे यांनी यावेळी स्पष्ट केले. शहारात शिवसेनेची काय ताकद आहे हे आम्ही भाजपला दाखवून देवू याचा पुनरुच्चार देखील दानवे यांनी यावेळी केला. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com