दानवेंचा बचाव करण्यासाठी चंद्रकांत पाटलांची धडपड - चंद्रकांत खैरे

 दानवेंचा बचाव करण्यासाठी चंद्रकांत पाटलांची धडपड - चंद्रकांत खैरे

औरंगाबाद : शिवसेनेच्या खैरेंचा पराभव दानवेंच्या जावयाने नाही, तर शिवसेनेच्या आमदारानेच केला हे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचे विधान म्हणजे दानवेंच्या बचावासाठी केलेली सारवासारव असल्याचा टोला शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी सरकारनामाशी बोलतांना लगावला. औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांचा साडेचार हजार मतांनी पराभव झाला. या पराभवाला रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव, भाजपचे काही स्थानिक पदाधिकारी आणि स्वतः दानवे जबाबदार असल्याचा हल्ला चंद्रकांत खैरे यांनी चढवला होता. रावसाहेब दानवेंनी युतीधर्म न पाळता जावई धर्म पाळला, त्यांना आर्थिक रसद पुरवल्याची तक्रार खैरेंनी थेट भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. 

हा वाद अजून पूर्णपणे शमला नाही तोच महसूल मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना पुन्हा या विषयाला हात घातला. खैरेंच्या पराभवाला भाजप नाही, तर शिवसेनाच जबादार असल्याचे त्यांनी म्हटले. यावर चंद्रकांत खैरे यांना विचारले असता ते म्हणाले, निवडणुकीत नेमक काय घडलं, कुणी विरोधात काम केले याची सगळी माहिती आपण शिवसेना आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना पुराव्यानिशी दिली होती. नेत्यांनी देखील या तक्रारीची दखल घेतली हे नुकत्याच झालेल्या फेरबदलावरून स्पष्ट होते. 

राज्यात प्रदेशाध्यक्ष पदावर असलेले रावसाहेब दानवे यांना केंद्रात बोलावून पुन्हा तेच जुने खाते आणि राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे. त्यामुळे कुठेतरी माझ्या तक्रारीची दखल वरिष्ठांनी घेतल्याचे दिसते. चंद्रकांत पाटलांनी केलेले विधान म्हणजे, दानवे यांच्या बचावासाठी केलेली सारवासारव आहे याचा पुनरुच्चार खैरे यांनी केला. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com