नव्या भारताच्या निर्मितीला बळ देणारा अर्थसंकल्प - रावसाहेब दानवे

नव्या भारताच्या निर्मितीला बळ देणारा अर्थसंकल्प - रावसाहेब दानवे

औरंगाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली समृध्द नवा भारत घडवण्यासाठी बळ देणारा आणि सामान्य माणूस केंद्रबिंदू असलेला हा केंद्रीय अर्थसंकल्प असल्याचे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केले आहे. देशाला नवी दिशा देणारा अर्थसंकल्प सादर केल्यायाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व अर्थमंत्री निर्मला सितारामन यांचे अभिनंदनही दानवे यांनी केले. 

भारताची अर्थव्यवस्था पाच लाख कोटी डॉलर्सची बनवून प्रमुख आर्थिक शक्ती बनण्यासाठी अनेक धोरणात्मक उपाय या अर्थसंकल्पात आहेत. देश समृध्दीकडे वाटचाल करत असतांना त्यामध्ये ग्रामीण भाग, गरीब, महिला, युवा, शेतकरी, मध्यमवर्गीय, छोटे व्यापारी, लघु उद्योजक या सर्वांनाच महत्वाचे स्थान असेल याची काळजी देखील घेण्यात आली असल्याचे दानवे म्हणाले. 

आगामी पाच वर्षात देशातील एकही व्यक्ती घर, पिण्याचे पाणी, वीज, गॅस कनेक्‍शन, शौचालय अशा सुविधांपासून वंचित राहणार नाही याची अर्थसंकल्पात पुरेपूर काळजी घेण्यात आली आहे. ग्रामीण भागात चांगले रस्ते, अखंडित वीज पुरवठा, शेतमालासाठी बाजारपेठ उपलब्ध करून देतांना दुप्पट उत्पन्न व्हाये यासाठी देखील अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. 

महिला बचत गटाला सवलतीच्या दरात कर्ज, सदस्यांना ओव्हरड्राफ्टची सुविधा अशा विशेष तरतूदींचा अंतर्भाव, युवकांना दर्जेदार शिक्षण, उद्योगांची भरभराट होऊन रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात यासाठी मेक इन इंडियाला चालना देण्यात आली आहे. व्यापाऱ्यांना पेन्शन योजना लागू करण्याचे आश्‍वासन देखील या अर्थसंकल्पात पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने नवा, समृध्द भारत घडवणारा हा अर्थसंकल्प असल्याचे दानवे यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com