रावसाहेब दानवे पुन्हा प्रचाराच्या मैदानात

जालना मतदारसंघातील प्रचार 21 एप्रिलला थांबविणार असल्यामुळे राहिलेल्या वेळात संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढण्याची तयारीही रावसाहेब दानवे यांनी केली आहे. त्यानुसार नियोजन करीत ते पुन्हा जोमाने प्रचाराला लागले आहेत. शहा यांच्या सभेनंतर रावसाहेब दानवे यांन आज पुन्हा डॉक्‍टरची भेट घेत तपासणी केली आहे. प्रचाराच्या कामाला लागले.
 रावसाहेब दानवे पुन्हा प्रचाराच्या मैदानात

औरंगाबाद : खूप ऊन लागल्यामूळे आणि घशाला झालेल्या इन्फेकशनमुळे भाजप प्रदेशाध्यक्ष तथा जालना लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे हे 8 एप्रिलपासून खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते. मात्र गुरुवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहा यांची जालन्यात झालेल्या सभेपूर्वी दानवे यांनी रुग्णालयातून सुट्टी घेत सभेच्या ठिकाणी हजेरी लावली. प्रचार सोडून दोन वेळा रुग्णालयात दाखल झालेले दानवे पुन्हा प्रचारात लागले आहेत. उद्या होणाऱ्या नितिन गडकरी यांच्या सभेपूर्वी दानवे यांनी पैठण येथे कॉर्नर बैठका घेतल्या. त्यानंतर फुलंब्रीसह जालना मतदारसंघात विविध ठिकाणी बैठका घेतल्या. 

प्रचाराच्या धामधुमीत वाढत्या उन्हाचा फटका बसल्यामूळे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना शहानुरमिया दर्गा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यानंतर चार दिवस विश्रांती घेऊन दानवे पुन्हा प्रचाराला लागले होते. मात्र 13 एप्रिलला त्यांना थ्रोट इन्फेकशनचा त्रास होऊ लागल्यामूळे त्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हापासून ते 18 एप्रिलपर्यंत रुग्णालयात होते. डॉक्‍टरांनी त्यांना सक्‍तीची विश्रांती सांगितली आहे. या विश्रांतीनंतर पुन्हा दानवे प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. प्रचाराचे दोन दिवस हाती असल्यामुळे होईल तेवढ्या प्रमाणात प्रचार करीत आहेत. 

दानवे रुग्णालयात असताना जालना लोकसभा मतदार संघात विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, शिवसेनेचे मंत्री अर्जुन खोतकर, आमदार संतोष दानवे, भाजप जिल्हाध्यक्ष, आमदार नारायण कुचे, आमदार भुमरे, यांच्यासह भाजपचे पदाधिकारी जालना मतदारसंघ पिंजून काढत आहे. एवढे नव्हे तर दानवे यांची कन्या श्रीमती पांडेही कामाला लागल्या आहेत. एकीकडे परिवार आणि दुसरीकडे पदाधिकारी मोठ्या जोमाने मतदारसंघात कामे करीत असल्याचे भाजपचे गटनेते प्रमोद राठोड यांनी सांगितले. 

मुख्यमंत्री पदाधिकाऱ्यांच्या भेटी 
शिवसेना-भाजप-रिपाई महायुतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्‍ते शहानवाज हुसैन यांची औरंगाबाद पूर्व विधानसभा मदतदार संघातील गजानन महाराज मंदीर चौकात 15 एप्रिलला जाहीर सभा झाली. या सभेनंतर मुख्यमंत्री व शहानवाज हुसैन काही पदाधिकाऱ्यांनी रावसाहेब दानवे यांची भेट घेतली होती. त्यापुर्वी 9 एप्रिलला रावसाहेब दानवे आजारी असल्याचे कळल्यानंतर कॉंग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनीही भेट घेत चर्चा केली होती. 

जालना मतदारसंघातील प्रचार 21 एप्रिलला थांबविणार असल्यामुळे राहिलेल्या वेळात संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढण्याची तयारीही रावसाहेब दानवे यांनी केली आहे. त्यानुसार नियोजन करीत ते पुन्हा जोमाने प्रचाराला लागले आहेत. शहा यांच्या सभेनंतर रावसाहेब दानवे यांन आज पुन्हा डॉक्‍टरची भेट घेत तपासणी केली आहे. प्रचाराच्या कामाला लागले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com