Dalit Youth Murder By NCP Officer Bearer | Sarkarnama

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याकडून  वायफळेतील दलिताचा खून: मृतदेह ताब्यात घेण्यास नकार 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 6 सप्टेंबर 2018

वायफळे (ता. तासगाव) येथे निवडणुकीच्या वादातून बेदम मारहाण झालेल्या राजेश परशुराम फाळके (वय 54) यांचा सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरु असताना आज मृत्यू झाला. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक तालुका उपाध्यक्ष राजेश पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. बुधवारी रात्री हा प्रकार घडला होता. 

तासगाव : वायफळे (ता. तासगाव) येथे निवडणुकीच्या वादातून बेदम मारहाण झालेल्या राजेश परशुराम फाळके (वय 54) यांचा सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरु असताना आज मृत्यू झाला. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक तालुका उपाध्यक्ष राजेश पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. बुधवारी रात्री हा प्रकार घडला होता. 

दरम्यान येथील शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी आणलेला मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिल्याने मोठा तणाव निर्माण झाला आहे. आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेतले जाणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. याबाबत काल पोलिसांनी पाटील याच्याविरोधात दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता. आज त्यांचा मृत्यू झाल्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. 

पाटील याने निवडणुकीत मागासवर्गीयांची मते मिळाली नाहीत म्हणून मारहाण केली. मारहाणीत फाळके यांच्या बरकड्या मोडल्या असल्याचे समजते. मारहाण केल्यानंतर पाटील याने पळ काढला होता. फाळके कुटुंबियांनी गंभीर जखमी अवस्थेत सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. दरम्यान, या घटनेचे पडसाद आज गावात उमटले. फाळके यांच्या हत्येचा निषेध करण्यात आला आहे. गुरुवारी सकाळी सिव्हिल रुग्णालयाच्या आवारात दलित संघटनांचे कार्यकर्ते गोळा झाले होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख