दलित समाज भाजपच्या पाठीशी- दानवे 

Raosaheb Danve
Raosaheb Danve

औरंगाबाद : काही वर्षापुर्वी आम्हाली निवडणूक लढवण्यासाठी दलित उमेदवार मिळत नव्हता, पण आज केंद्र व राज्यामध्ये सर्वाधिक दलित खासदार व आमदार भारतीय जनता पक्षाचे आहेत. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत भाजपने 22 दलित नगराध्यक्ष केले. पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत देखील भाजपने मोठ्या संख्येने दलितांना उमेदवारी देऊन निवडूण आणले. आमच्यावर जातीयवादी पक्ष म्हणूण आरोप केला जातो पण आज देशभरातील सगळा दलित समाज भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी औरंगाबादेत केला. 

नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकी भाजपला राज्यात घवघवीत यश मिळाल्याबद्दल भाजपच्या वतीने रावसाहेब दानवे यांचा जाहीर सत्कार आयोजित करण्यात आला होता. या सत्काराला उत्तर देतांना दानवे म्हणाले, मायावती, करुनानिधी, जयललिता, रामविलास पासवान, शरद पवार या सगळ्याच पक्षाच्या नेत्यांनी भाजपवर जातीयवादी पक्ष म्हणून टिका केली. पण सत्ता मात्र भाजपच्या मदतीनेच उपभोगली. प्रत्यभात सर्व जाती, धर्मांना सोबत घेऊन चालणारा पक्ष म्हणून भाजपने विश्‍वासहार्ता मिळवली आहे. त्यामुळेच दलित समाजाचा भाजपला पाठिंबा मिळत आहे. उलट आमच्यावर जातीयवादी पक्ष म्हणून टिका करणाऱ्या कॉंग्रेसनेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दोनवेळा लोकसभा निवडणुकीत पराभूत केले. त्यावेळचे पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी बाबासाहेबांच्या विरोधात केवळ उमेदवारच उभा केला नाही तर त्यांना पराभूत करण्यासाठी प्रचार सभा देखील घेतल्याची आठवण दानवे यांनी यावेळी करुन दिली. नुकत्याच झालेल्या उत्तर प्रदेश, उत्तराखंड राज्यात भाजपला मिळालेल्या दोन तृतीयांश बहुमतामध्ये दलित समाजाचा मोठा वाटा असल्याचेही दानवे यांनी सांगितले. 

हयात नसलेल्या व्यक्तीची उमेदवारी 

दलितांना भाजपने कसा न्याय दिला हे सांगण्यासाठी दानवे यांनी भोकरदन तालुक्‍यातील निवडणुकीचे उदाहरण दिले. खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीसाठी दलित उमेदवा मिळत नव्हता, तेव्हा एकाने सावळे नावाच्या कार्यकर्त्यांची माहिती दिली. त्याच गाव 30 कि.मी. लांब आणि फॉर्म भरण्याची वेळ संपत आली. मग त्याचा अंगठा मारूण आम्हीच फॉर्म भरला. पुढे आमची दुसऱ्या पक्षाशी युती झाली आणि दलित उमेदवाराचा मतदारसंघ त्यांच्याकडे गेला. अंगठा मारून फॉर्म तर भरला, पण माघार घ्यायची तर उमेदवार समोर पाहिजे. मग त्याला शोधत त्यांच्या शेतात पोचलो. त्याच्या म्हाताऱ्या आईला विचारले सुभाष कुठे गेला, तर ती गळ्यात पडून रडायला लागली. म्हटंल आई काय झालं, तर ती म्हणाली तो मरूण तीन महिने झाले, तु इतक्‍या उशीरा कसा आला? मला घाम फुटला, म्हणालो आई मला कालच कळंल. तिथून धावपळत निघालो, भोकरदनला आलो आणि राजकीय डावपेच खेळून कशी तरी उमेदवारी मागे घेतली. एककाळ तो होत जेव्हा उमेदवार मिळत नव्हता आणि आज सर्वाधिक दलित आमच्या पक्षात आहेत.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com