जेवणाच्या व्यवस्थेसाठी दररोज शंभर फोन येतात-  प्रदीप जयस्वाल 

कोरोना विरोधातील लढा जिंकण्यासाठी केंद्र व राज्य सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. देशात व राज्यात लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर गोरगरीब, हातावर पोट भरणाऱ्या तसेच मजुरांची मोठ्या प्रमाणात उपासमारी होत होती. अनेक सामाजिक संस्था, राजकीय पक्ष ,संघटना व नेते यासाठी सरसावले आहेत तरीही मला येणाऱ्या रोजच्या फोन कॉल्समध्ये किमान शंभर फोन हे जेवणाची व्यवस्था करा यासाठीचे असतात असे शिवसेनेचे आमदार प्रदीप जयस्वाल यांनी सरकारनामाशी बोलताना सांगितले.
daily 100 calls come for meal says pradeep jaiswal
daily 100 calls come for meal says pradeep jaiswal

औरंगाबाद : कोरोना विरोधातील लढा जिंकण्यासाठी केंद्र व राज्य सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. देशात व राज्यात लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर गोरगरीब, हातावर पोट भरणाऱ्या तसेच मजुरांची मोठ्या प्रमाणात उपासमारी होत होती. अनेक सामाजिक संस्था, राजकीय पक्ष ,संघटना व नेते यासाठी  सरसावले आहेत तरीही मला येणाऱ्या रोजच्या फोन कॉल्समध्ये किमान शंभर फोन हे जेवणाची व्यवस्था करा यासाठीचे असतात असे शिवसेनेचे आमदार प्रदीप जयस्वाल यांनी सरकारनामाशी बोलताना सांगितले.

आमदार जयस्वाल म्हणाले, की लॉकडाऊन असल्यामुळे सर्वच लोकप्रतिनिधी आपापल्या घरातून किंवा सुरक्षेचे सगळे उपाय करून बाहेर पडून गरजूंना मदत करताहेत. शिवसेना यात आघाडीवर असून मोफत अन्नधान्य, अन्न पाकीट व पिण्याची पाण्याची व्यवस्था पक्षाकडून केली जात आहे .संकटाच्या काळात राजकीय मतभेद बाजूला सारून सगळेच पक्ष लोकांच्या मदतीला धावून जात आहेत .

परंतु सकाळी आणि दुपारी जेवण दिल्यानंतर अनेकांना रात्रीच्या जेवणाचा प्रश्न सतावतो आहे .लोकप्रतिनिधी म्हणून अनेक भागातून आम्हाला अमुक ठिकाणी इतके लोक आहेत त्यांच्या जेवणाची व्यवस्था करावी लागेल असे फोन येतात, त्यावेळी आम्ही शक्य तेवढी मदत करतो, असे त्यांनी सांगितले.

 रेशनच्या दुकानावर कार्डधारकांना धान्य मिळणार असले तरी ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाही अशा लोकांचे काय हा खरा प्रश्न आहे?  त्यावर मी व माझे मित्रमंडळ येत्या एक-दोन दिवसात 5000 गरजूंना आवश्यक दैनंदिन वस्तूंचे किट वाटप  करणार आहोत. ज्यामध्ये गहू ,तांदूळ  तूर डाळ ,चनादाल व इतर गोष्टींचा समावेश असेल, असे ते म्हणाले.

रक्तदानासाठीही पुढाकार 
शहरांमध्ये कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी संपूर्ण आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे .परंतु शहरात रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे .अशावेळी शिवसेना रक्तदानासाठीही पुढाकार घेणार असल्याचे प्रदीप जयस्वाल यांनी सांगितले .

लॉक डाऊनची घोषणा होण्यापूर्वीच शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवश्यक ती सर्व मदत लोकांना करण्याचे सांगितले आहे. पक्षपातळीवर प्रत्येक जिल्ह्यातील आढावा घेतला जात आहे.

कुठल्याही प्रकारे लोकांची उपासमार होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार शिवसेनेचे आमदार ,नगरसेवक ,जिल्हा परिषदेचे सदस्य व सामान्य शिवसैनिक लोकांच्या मदतीला धावून जात असल्याचेही जयस्वाल यांनी सांगितले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com