गोविंदांच्या सुरक्षेला प्राधान्य देत दहीहंडी साजरी करा : आशीष शेलार 

 गोविंदांच्या सुरक्षेला प्राधान्य देत दहीहंडी साजरी करा : आशीष शेलार 

मुंबई: दहीहंडीचा पारंपरिक उत्सव साजरा करताना गोविंदांच्या सुरक्षेला प्राधान्य द्या. गोविंदा मंडळे व आयोजकांना सुलभपणे परवानग्या द्या, असे निर्देश क्रीडामंत्री आशीष शेलार यांनी दिले आहेत. 

दहीहंडी उत्सवाबाबत मंत्रालयात क्रीडामंत्री आशीष शेलार यांनी आढावा बैठक घेतली. पारंपरिक दहीहंडी उत्सव साजरा करताना गोविंदा पथकांचा 10 लाखांपर्यंत विमा उतरवण्यात यावा, ध्वनिप्रदूषण रोखा, गोविंदांच्या सुरक्षेसाठी सेफ्टी बेल्ट, हेल्मेट, मॅट यांचा वापर करा, उत्सवस्थळी रुग्णवाहिकांची व्यवस्था करा आदी अटी न्यायालयाने घातल्या आहेत. या अटींचे पालन करून आयोजक आणि गोविंदा पथकांना सुलभपणे परवानग्या द्याव्या, अशी भूमिका दहीहंडी समन्वय समितीने या बैठकीत मांडली. 

क्रीडामंत्री शेलार यांनी या भूमिकेचे स्वागत केले आणि सरकारी विभागांनी परवानगी देण्याची प्रक्रिया सुलभ करावी, असे निर्देश दिले. गोविंदा पथकांचा विमा, वाहतूक नियंत्रण याबाबतही पोलिसांनी दक्षता घ्यावी, असे त्यांनी सांगितले. 

या बैठकीला विशेष महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) मिलिंद भारांबे, सहआयुक्त (कायदा सुव्यवस्था) मनोजकुमार चौबे, सांस्कृतिक कार्य प्रसंचालक मीनल जोगळेकर यांच्यासह दहीहंडी समन्वय समितीचे अध्यक्ष श्रीकृष्ण पडेलकर, सुरेंद्र पांचाळ, समीर सावंत, गीता झगडे, अभिषेक सुर्वे, डेव्हिड फर्नांडिस, समीर पेंढारे, अरुण पाटील आदी उपस्थित होते.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com