dada bhuse and state farmers | Sarkarnama

कृषी मंत्री आता थेट बळीराज्याच्या बांधावर, दादा भुसे यांचा अनोखा उपक्रम

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

मुंबई : शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी " कृषी मंत्री एक दिवस शेतावर ' हा उपक्रम राबविण्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी नुकतेच नागपूर येथे झालेल्या कार्यक्रमात जाहीर केले होते. त्याची अंमलबजावणी आठवडाभराच्या आतच कृषिमंत्र्यांनी केली असून, आज त्यांनी मालेगाव तालुक्‍यातील वळवाडे, अजंग-वडेल, झोडगे आणि माळमाथा भागातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. गावात कृषी अधिकारी, कृषी साहाय्यक येतात का, अशी विचारणाही यावेळी कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांना केली. 

शेतकऱ्यांना कृषी उत्पादनवाढीसाठी प्रोत्साहन देतानाच त्यांच्या समस्या जाणून घेण्याकरिता एक दिवस शेतावर हा उपक्रम कृषिमंत्री भुसे यांनी सुरु केला असून, कृषी सचिव, आयुक्त यांनी 15 दिवसांतून एकदा, तर जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी दर आठवड्याला शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधावा, अशा सूचना केल्या आहेत. या भेटीत पीक नियोजन, उत्पादन क्षमता याबाबत चर्चा करतानाच उपलब्ध बाजारपेठ आणि विविध कृषी योजनांविषयी शेतकऱ्यांना माहिती द्यावी, असेही कृषीमंत्री भुसे यांनी विभागाला सांगितले आहे. 

नागपूर येथील शेतकरी पुरस्कार सोहळ्यामध्ये ही घोषणा करून कृषिमंत्र्यांनी आजपासून त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरु केली. मालेगाव तालुक्‍यातील वळवाडे येथील शांताराम गवळी या शेतकऱ्याच्या शेतावर जाऊन त्यांनी त्यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. पीक विमा योजना, कांदा उत्पादन याबाबत त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. तुमच्या समस्या जाणून घेण्याकरिता कृषी साहाय्यक, कृषी अधिकारी तुमच्याकडे येतात का, अशी विचारणाही कृषिमंत्र्यांनी यावेळी केली. भुसे यांनी आज दिवसभरात शेतकऱ्यांशी संवाद साधला. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख