कृषीमंत्री दादा भुसेंच्या गावचे शेतकरी म्हणतात, "कीडनी घेता कीडनी' 

राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांच्या मतदारसंघातील शेतकरी, निराधार महिला अक्षरशः रस्त्यावर येऊन "किडनी घेता का किडनी' अशा घोषणा देत आंदोलन करीत आहेत. त्यामुळे शहरात या आंदोलनाची चर्चा सुरू आहे.
 कृषीमंत्री दादा भुसेंच्या गावचे शेतकरी म्हणतात, "कीडनी घेता कीडनी' 

मालेगाव : दाभाडी (मालेगाव) हे मंत्र्यांचे गाव. या गावातील एका बॅंकेतील शेतकऱ्यांचे पैसे काढून कोट्यावधींची फसवणूक केली.

या फसवणुकीच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी बॅंकेच्या विभागीय कार्यालयापुढे अभिनव आंदोलन सुरू केले असून आमचे किडनी, लिव्हर आणि डोळे विक्रीला काढल्याचा फलक घेऊन सरकारचे लक्ष वेधून घेतले आहे. 

शेतकरी नेते शेखर पवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरु आहे. त्यात साठ ते सत्तर महिला व बॅंक खातेदार सहभागी झाले आहेत. गेल्या वर्षभरात दाभाडी येथील बॅंकेचा बॅंक मित्र असलेल्या प्रतिनिधीने बॅंकेतील या खातेदारांचे पैसे त्यांचेच सह्या व अंगठे घेऊन काढून घेतले. त्यात निराधार, परितक्‍त्या व विधवा महिलांना मिळत असलेले निराधार योजनेचे पैसेही परस्पर काढण्यात आले. 

दीड ते दोन कोटींचा हा अपहार आहे. मात्र बॅंक या ग्राहकांना पैसे देण्यास तयार नाही. राजकीय नेते, लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून पाठपुरावा केल्याचा उपयोग झाला नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांनी आजपासून बॅंकेच्या नाशिक शहरातील विभागीय कार्यालयापुढे धरमे आंदोलन सुरु केले.

त्यासाठी त्यांनी बॅंकेच्या दरवाजावर फलक लावला आहे. त्यात बॅंके आमचे पैसे देण्यास टाळाटाळ करते. त्यामुळे आम्ही आमचे किडनी, डोळे, लिव्हर विक्रीला काढले आहे. पैसे नसल्याने आमच्या किडनी घ्या पण न्याय द्या अशी मागणी हे शेतकरी करीत आहेत. 

"बॅंकेच्या प्रशासनाच्या चुकीमुळे हा कोट्यावधींचा अपहार झाला आहे. त्यामुळे बॅंकेने आमचे पैसे परत दिले पाहिजे. न दिल्यास आम्ही आमचे अवयव विक्रीला काढले आहेत. ते घ्यावेत असे आमचे म्हणने आहे. - शेखर पवार, पिडीत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com