भाजप जळगाव जिल्हाध्यक्ष उदय वाघांचा राजीनामा; डॉ. संजीव पाटील यांची नियुक्त 

भारतीय जनता पक्षाचे जळगाव जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी पदाचा राजीनामा दिला असून त्यांच्या रिक्त पदावर भडगाव येथील डॉ.संजीव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे वृत्त आहे.
भाजप जळगाव जिल्हाध्यक्ष उदय वाघांचा राजीनामा; डॉ. संजीव पाटील यांची नियुक्त 

जळगाव : भारतीय जनता पक्षाचे जळगाव जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी पदाचा राजीनामा दिला असून त्यांच्या रिक्त पदावर भडगाव येथील डॉ.संजीव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे वृत्त आहे. 

भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या पत्नी सौ. स्मिता वाघ यांना लोकसभेची उमेदवारी जाहिर करण्यात आली होती. त्यांनी उमेदवारी अर्जही दाखल केला होता. परंतु ऐनवेळी पक्षाने त्यांची उमेदवारी रद्द करून चाळीसगावचे आमदार उन्मेश पाटील यांना उमेदवारी जाहिर केली. याच वेळी अमळनेरचे माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील यांनी एका जाहिर सभेत उदय वाघ यांच्या विरूध्द जाहिर टिका केली होती. त्यावरून अमळनेर येथे पक्षातर्फे लोकसभा उमेदवार उन्मेश पाटील यांच्या प्रचाराच्या सभेत उदय वाघ यांनी माजी आमदार बी.एस.पाटील यांना माराहाण केली होती. यावेळी जलसंपदामंत्री व पक्षाचे नेते गिरीश महाजनही उपस्थित होते. 

अमळनेरच्या सभेतील हा गोंधळ देशभर गाजला होता. या वादानंतर उदय वाघ पक्षाच्या प्रचारात फारसे दिसून आले नाही. गेले काही दिवस ते जिल्ह्याबाहेरच होते. जळगावात आल्यानंतर पक्षाच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहिले होते. जळगाव विमानतळावर त्यांनी जलसंपदामंत्री व पक्षाचे नेते गिरीश महाजन यांचीही भेटही घेतली होती. त्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून जिल्हापक्षाध्यक्ष बदलाच्या हालचाली सुरू झाल्याचे सांगण्यात येत होते. 

उदय वाघ यांनी गुरूवारी (ता.20) जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे पाठविला असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत वाघ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही दुजोरा दिला आहे. आपल्या वैयक्तीक कारणाने आपण पद सांभाळू शकत नसल्याचे कळविले असल्याचे त्यांनी सांगितले. 

त्यांच्या रिक्तपदावर भडगाव येथील भाजपचे पदाधिकारी डॉ. सजीव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत डॉ.संजीव पाटील यांच्यशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आपल्याला याबाबत माहिती नाही, मात्र पालकमंत्री गिरीश महाजन व विभागीय संघटनमंत्री किशोर काळकर यांनी आपल्याला मुंबईला उदया (ता.22) मुंबईला पाचारण केले आहे. त्यानुसार आपण मुंबईला रवाना होत आहोत. 

डॉ.संजीव पाटील हे भडगाव येथील रहिवासी असून भाजप वैदयकिय आघाडीचे अध्यक्ष आहेत.त्यांनी तालुकाध्यक्षपदही भूषविले आहे. अमळदे गिरड गटातून ते जिल्हा परिषद सदस्यपदीही निवडून आले होते. ते जळगाव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आहेत.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com