टपाल खात्याला अद्यापही सायकल प्रिय - Cycle Must for Postman's | Politics Marathi News - Sarkarnama

टपाल खात्याला अद्यापही सायकल प्रिय

प्रल्हाद कांबळे
बुधवार, 17 मे 2017

नांदेड  भारतीय डाक विभागाच्या वतीने नांदेड जिल्ह्यात १०६ ग्रामीण डाक सेवक पदाची सरळ भरती होणार आहे. राज्यभरातून जवळपास एक हजार ७८९ ग्रामीण डाक सेवक पदाच्या जागा भरण्यासाठी उमेदवारांकडुन आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठी २१ मे पर्यंत मुदत देण्यात आली आहे. यामध्ये अर्ज दाखल करताना सायकल येणा-या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

पूर्वी सायकलवरून पोस्टमन गावामध्ये पञ वाटपाचे काम करीत असे. त्यामुळे पुर्वीपासुनच पोस्टमन आणि सायकल असे पक्के समीकरण आहे. परंतु, दुचाकी आल्यानंतर सायकल ऐवजी बहुतांश पोस्टमनकडे दुचाकी वाहने आली आहेत. त्यामुळे आता पञ वाटपाचे काम दुचाकीवरून होत असल्याचे दिसत आहे. माञ, डाक विभाग पोस्टमन साठी सायकलची परंपरा आजही कागदोपञी जपत आहे. भारतीय डाक विभागाकडुन राज्यभर ग्रामीण डाक सेवक पदाच्या एक हजार ७८९ पदांसाठी जाहीरात काढली आहे. यासाठी ६ मे पर्यंत आॅनलाईन अर्ज दाखल करण्याची मुदत ठेवण्यात आली होती.

परंतू, तांञिक अडचण व उमेदवारांचा प्रतिसाद लक्षात घेता ही मुदत २१ मे पर्यंत वाढविण्यात आली आहे.अर्ज दाखल करताना उमेदवारांना विविध अटी टाकल्या आहेत. यामध्ये सायकल चालविता येत असल्याचे प्रमाणपञ सादर करणे आवश्यक आहे. त्यामुळे सायकलला आजही डाक विभागात अनन्य असे महत्व असल्याचे दिसून येते. उमेदवारांनी सायकल चालविता येते असे त्याच्या अर्जामध्ये नमुद करणे महत्वाचे आहे. जिल्ह्यातील अजूनही काही बेरोजगार तरुणांनी आपले अर्ज दाखल करावे असे आवाहन जिल्हा टपाल अधिक्षक एस. एम. अली यांनी केले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख