Cut throat competition for ministerial berth in Shiv Sena | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

मंत्रिपद मिळवण्यासाठी शिवसेनेची रस्सीखेच

सुचिता रहाटे : सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

मंत्रिमंडळ विस्ताराचा  शेवटचा टप्पा असल्यामुळे शेवटच्या २ वर्षांत चांगल्या कामगिरीची गरज असल्याने मंत्रिपदाची शर्यत चांगलीच रंगणार आहे.

मुंबई :  नुकत्याच झालेल्या एनडीएच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आपली उपस्थिती दर्शवत भाजपबरोबर  पुन्हा मनोमिलन झालेले आहे असे दाखवून दिले. शिवसेनेच्या वाट्याला  अजून खाती  यावीत  म्हणून शिवसेना अध्यक्ष स्वतः उद्धव ठाकरे प्रयत्नशील आहेत. यातच पुढील महिन्यात मंत्रिमंडळाचा विस्तार असून राज्यातल्या काही मंत्र्यांना डच्चू तर काही नवीन व युवा नेत्यांची मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

मंत्रिमंडळात सध्या ३९ सदस्य असून काही पदे नव्याने भरली जाणार आहेत. यामध्ये भाजप व शिवसेना यांमधील काही मंत्र्यांकडे असलेली जास्त खाती कमी होऊन नवीन नेत्यांना संधी देण्यात येणार आहे. याच संधीचा फायदा घेऊन शिवसेनेच्या पदरात नवीन खाती पडतील असे सूत्रांकडून सांगितले जाते. २०१९ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे फेरबदल करण्यात असल्याचे म्हटले जाते. यामध्ये शिवसेनेच्या नीलम गोर्हे यांचीही मंत्रीपदी वर्णी लागेल असे सूत्रांकरून समजते. मागच्या कामगिरीचा आढावा घेत कोणाच्या पदरात कोणती खाती पडतील व कोणाला डच्चू मिळेल तेहि स्पष्ट होईल तसेच मंत्रिमंडळ विस्ताराचा  शेवटचा टप्पा असल्यामुळे शेवटच्या २ वर्षांत चांगल्या कामगिरीची गरज असल्याने मंत्रिपदाची शर्यत चांगलीच रंगणार आहे. मंत्रिमंडळ विस्तारामुळे भाजप पक्षात बरीच खळबळ असल्याचे पाहायला मिळते. यातच शिवसेनेच्याही पदरात १ किंवा २ मंत्रिपद पडण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख