Curiosity About Aditya Thakrey Public Meeing in Nashik | Sarkarnama

आदित्य ठाकरे नाशिकमध्ये काय बोलणार याची उत्सुकता

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे उद्या (ता.10) विधानसभा निवडणूक प्रचारासाठी दौरा सुरु करणार आहेत. पहिल्या दिवशी त्यांच्या शहापूर आणि घोटी येथे आमदार निर्मला गावित यांच्या प्रचारासाठी सभा होतील.

नाशिक : युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे उद्या (ता.10) विधानसभा निवडणूक प्रचारासाठी दौरा सुरु करणार आहेत. पहिल्या दिवशी त्यांच्या शहापूर आणि घोटी येथे आमदार निर्मला गावित यांच्या प्रचारासाठी सभा होतील.

आदित्य ठाकरे यंदा वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. गेले चार दिवस या मतदारसंघात प्रचार करीत आहेत. विधीमंडळातील भावी नेते म्हणून प्रतिमेसाठी ते राज्यात काही ठिकाणी प्रचाराला जाणार आहेत. त्यातील पहिला दौरा शहापूर व इगतपुरी मतदारसंघात ते करणार आहेत. त्यामुळे विधानसभेच्या या प्रचार दौ-यातील पहिल्या सभेत ते काय बोलणार, कोणता मुद्दा मांडणार याविषयी उत्सुकता आहे.  

इगतपुरी- त्र्यंबकेश्‍वर मतदारसंघातील शिवसेना, भाजप महायुतीच्या उमेदवार आमदार निर्मला गावित यांच्या मतदारसंघात ही सभा होईल. आमदार निर्मला गावित यांच्या प्रचारासाठी उद्या (ता.10) सकाळी अकराला घोटी शहरात सिन्नर फाटा येथून शहरात रॅली काढण्यात येईल. या रॅलीत पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होतील. ही रॅली घोटी शहरातील मेन रोड, बाजारपेठ यांसह विविध भागातुन इंद्रप्रस्थ लॉन्स येथे जाईल. दुपारी एकला रॅलीचा समारोप इंद्रप्रस्थ लॉन्स येथे आदित्य ठाकरे यांच्या सभेने होईल. यानिमित्ताने जिल्ह्यातील युवा सेनेचे सर्व पदाधिकारी सभेसाठी उपस्थित राहतील.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख