लॉकडाऊन वाढण्याच्या चिंतेने नगरमध्ये किराना भरण्यासाठी गर्दी 

कोरोना प्रतिबंधाच्या लढ्याचा भाग म्हणून 14 एप्रिलपर्यंत लॉक डाऊन आहे. त्या काळात लोकांनी विनाकारण बाहेर पडू नये. सद्य परिस्थितिचे गांभिर्य ओळखावे.
crowdedness in nagar district  for buying groceries
crowdedness in nagar district for buying groceries

नगर : दिल्लीतील एका धार्मिक कार्यक्रमातून आलेल्या परदेशी नागरिकांमुळे नगर जिल्ह्यात वाढलेल्या कोरोनामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण तयार झाले आहे. 14 पर्यंत असलेला लॉकडाऊन अधिक वाढेल का, अशी शक्यता चर्चिली जात आहे. त्यामुळे किराना सामान भरण्यासाठी आज पुन्हा गर्दी दिसून आली.

जगभर थैमान घातलेल्या कोरोनामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागही हाबकून गेला आहे. दिल्लीतील एका धार्मिक कार्यक्रमातील सहभागी असलेले परदेशी नागरिक जिल्ह्यात आल्याने त्यांच्या संसर्गामुळे नगर जिल्ह्यातील नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. या लोकांमधील एक जत्था शेवगाव तालुक्यातही काही दिवस वास्तव्यास होता. त्यामुळे शेवगाव-पाथर्डी हे दोन्ही तालु्के सध्या भितीच्या सावटाखाली आहेत. नगर शहराबरोबरच संगमनेर, जामखेड तालुक्यात तर कोरोनाचे रुग्ण सापडले असल्याने हे दोन्ही तालुक्यात प्रशासन अधिक सतर्क झाले आहे.  

प्रशासनाला पुण्याच्या प्रयोगशाळेतून काल 111 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे दुपारी स्पष्ट झाले होते. रात्री उशिरा आलेल्या काही अहवालानुसार तीनजण पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. त्यामध्ये जामखेड व संगमनेर तालुक्यातील नागरिकांचा समावेश आहे. जिल्ह्यात यापूर्वी 327 व्यक्तींचे स्त्राव तपासणीसाठी पाठविले होते. त्यापैकी 17 जण पॉझिटिव्ह असून, एकाचा अहवाल येणे बाकी आहे. इतर 155 व्यक्ती देखरेखीखाली आहेत. एक व्यक्ती बरा झाला असून, त्याला डिस्चार्जही दिला आहे. 

एक लाखापेक्षा जास्त लोकांवर नजर
प्रशासनाने जिल्हाभर संशयित किंवा कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्या लोकांच्या हातावर क्वारंटाईनचा शिक्का मारून त्यांच्यावर नजर ठेवली आहे. आशा सेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी, सरकारी कर्मचारी आदींच्या माध्यमातून एक लाखापेक्षा जास्त लोकांना अशा बद्धतीने क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांना घरातच थांबून राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. 

संगमनेर, जामखेडमध्ये कठोर कारवाई
संगमनेर व जामखेड या दोन तालुका पातळीवरील गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळल्याने प्रशासनाने तेथे कठोर पावले उचलली आहेत. वैद्यकीय गरज वगळता कोणालाही बाहेर येऊ दिले जात नाही. तसेच सर्व सिमा लॉक करण्यात आल्या असून, तेथून कोणालाही बाहेर जावू दिले जात नाही व बाहेरच्या व्यक्तीला तालुक्याच्या हद्दित प्रवेश दिला जात नाही. मुख्य रस्त्यांवर पोलिसांनी गस्त ठेवली आहे.
 
कोरोना प्रतिबंधाच्या लढ्याचा भाग म्हणून 14 एप्रिलपर्यंत लॉक डाऊन आहे. त्या काळात लोकांनी विनाकारण बाहेर पडू नये. सद्य परिस्थितिचे गांभिर्य ओळखावे. नियमांचे उल्लंघण करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com