राणेंच्या मदतीने  सिंचन महामंडळ मिळविले तेव्हा पारकरांना राणेंची दहशत दिसली नाही का? - बंडू हर्णे  

आमदार नीतेश राणे यांचे आंदोलन हा जनतेचा उद्रेक होता. या आंदोलनावर टीका करून संदेश पारकर हे सर्वसामान्यांच्या प्रश्‍नापेक्षा ठेकेदार आणि हायवे अधिकाऱ्यांवरच अधिक प्रेम असल्याचे दाखवून देत आहेत. हायवेवर अपघात होऊन दगावणाऱ्या प्रवाशांपेक्षा अभियंत्यावरील चिखलफेकीचे दु:ख त्यांना अधिक झाले आहे, अशी टीका नगरसेवक बंडू हर्णे यांनी केली.
राणेंच्या मदतीने  सिंचन महामंडळ मिळविले तेव्हा पारकरांना राणेंची दहशत दिसली नाही का? - बंडू हर्णे  

कणकवली  : आमदार नीतेश राणे यांचे आंदोलन हा जनतेचा उद्रेक होता. या आंदोलनावर टीका करून संदेश पारकर हे सर्वसामान्यांच्या प्रश्‍नापेक्षा ठेकेदार आणि हायवे अधिकाऱ्यांवरच अधिक प्रेम असल्याचे दाखवून देत आहेत. हायवेवर अपघात होऊन दगावणाऱ्या प्रवाशांपेक्षा अभियंत्यावरील चिखलफेकीचे दु:ख त्यांना अधिक झाले आहे, अशी टीका नगरसेवक बंडू हर्णे यांनी केली.

भाजपचे नेते संदेश पारकर यांनी काल केलेल्या आरोपांच्या पार्श्‍वभूमीवर नगराध्यक्ष दालनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी आरोग्य सभापती प्रतीक्षा सावंत, नगरसेवक अॅड. विराज भोसले, माजी नगरसेवक अण्णा कोदे, अजय गांगण आदी उपस्थित होते. हर्णे म्हणाले, "मेपासून महामार्गावरून जाणारे प्रवासी, वाहनचालक आणि सर्वसामान्य जनता त्रस्त आहे. या प्रश्‍नांची सोडवणूक करण्यासाठी मोर्चे, आंदोलने झाली. शेवटी कणकवलीवासीयांच्या घरात पाणी तुंबले. लाखोंची हानी झाली तेव्हा जनतेचा उद्रेक झाला. त्याचीच परिणती हायवे उपअभियंत्यावर चिखलफेकीत झाली; मात्र जनतेचे हे दु:ख समजून घेण्याची कुवत पारकर यांच्यात नाही. त्यांना आपल्या हिताची आणि प्रतिष्ठेची अधिक काळजी आहे. त्यांचा वाढदिवस जवळ आल्याने त्यांना सर्वसामान्यांचे प्रश्‍न विसरून ठेकेदार आणि हायवे अधिकाऱ्यांचीच अधिक काळजी दिसते.''

राणे कुटुंबीयांवर पारकर यांनी दहशतीचा आरोप केला आहे; मात्र याच राणेंकडे येऊन पारकर यांनी कोकण सिंचन महामंडळाचे उपाध्यक्षपद मिळविले. तेव्हा पारकरांना राणेंची दहशत दिसली नाही का? असाही सवाल हर्णे यांनी केला. कणकवली नगराध्यक्षपदाची निवडणूक ते हरले. त्यानंतर आता विधानसभा निवडणूक जवळ आल्याने त्यांना आमदारकीची स्वप्ने पडत आहेत. त्यामुळे राणेंवर आरोप करून ते प्रसिद्धी मिळवू पाहत असल्याची टीका त्यांनी केली.

मंत्री ट्रकचालकाच्या घरी जातील?
हायवे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावरील चिखलफेकीनंतर राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील तातडीने शेडेकर यांच्या घरी गेले. तेवढीच तत्परता दाखवून पाटील आता तेर्से बांबार्डे येथे अपघातात बळी पडलेल्या ट्रक चालकाच्या घरी जाऊन दाखवणार का? असा प्रश्‍न नगरसेवक हर्णे यांनी आज उपस्थित केला. महिन्यापूर्वी प्रांत कार्यालयात हायवे उपअभियंता शेडेकर यांना धक्‍काबुक्‍की आणि शिविगाळ झाली होती. पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा प्रकार घडला होता. त्यावेळी सक्षम पोलिस यंत्रणेने गुन्हा दाखल का केला नाही? असाही प्रश्‍न हर्णे यांनी उपस्थित केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com