गुरु शरद पवार भारी पडत असल्याची मोदींना जाणीव : छगन भुजबळ

गुरु शरद पवार भारी पडत असल्याची मोदींना जाणीव : छगन भुजबळ

शरद पवार हे आपले गुरु आहेत. त्यांच बोट धरुन आपण राजकारण केलं, असं सांगणारे मोदी आता शरद पवार यांच्यावर जाहीर भाषणात टीका करत आहेत. कदाचित गुरु भारी पडत असल्याची जाणीव मोदींना झाली. त्यामुळे धास्तावलेल्या मोदींनी पवार साहेबांवर, कुटुंबावर टीका करणे सुरु केले असल्याचे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज येथे केले.

नागपूर : शरद पवार हे आपले गुरु आहेत. त्यांच बोट धरुन आपण राजकारण केलं, असं सांगणारे मोदी आता शरद पवार यांच्यावर जाहीर भाषणात टीका करत आहेत. कदाचित गुरु भारी पडत असल्याची जाणीव मोदींना झाली. त्यामुळे धास्तावलेल्या मोदींनी पवार साहेबांवर, कुटुंबावर टीका करणे सुरु केले असल्याचे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज येथे केले.

पंतप्रधान मोदी यांच्या हातात देशातील तपास यंत्रणा आहेत. त्यामुळे ते केवळ धमकावून तुरुंगात टाकण्याची भाषा करतात, अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली. काल गोंदीया येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'तिहार जेलमधील अटकेत असलेले काही आरोपी आपलं नाव सांगतील म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तुर्रमखान नेत्यांना झोप लागत नाही', अस वक्तव्य केलं होतं. यावर मोदींना भुजबळांनी प्रत्युत्तर दिलं. मोदी आणि शहा यांच्यावरही गोध्रा हत्याकांड आणि हत्यासारखे गुन्हे दाखल आहेत. सत्ता गेल्यावर ज्या लोकांची कुटुंब उद्‌वस्त झाली ते लोकच मोदी आणि अमित शहा यांची प्रकरण बाहेर पुन्हा काढतील, असेही भुजबळ म्हणाले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यात पाकीस्तानशी चर्चा करण्याचा उल्लेख आहे. यावर टीका होऊ लागली आहे. मात्र पाकिस्तानात जाऊन केक खान्यापेक्षा चर्चा केली तर गैर काय, असा सवालही त्यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com