अधिवेशन सोडून आमदार आैटी फिरतात गल्लीबोळात : पारनेर नगरपंचायतीचे पदाधिकाऱ्यांकडून टीका

नगरपंचायतीच्या माध्यामातून व निधीतून पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीकडे जाणा-या पक्या सिमेंट रस्त्याच्या कामाचे उदघाटन आज आमदार विजय औटी यांनी केले. त्यानंतर नगरे व चेडे यांनी ही टीका केली.
अधिवेशन सोडून आमदार आैटी फिरतात गल्लीबोळात : पारनेर नगरपंचायतीचे पदाधिकाऱ्यांकडून टीका

पारनेर (जि. नगर) : पारनेर नगरपंचायत ताब्यातून गेल्यापासून व शिवसेनेअंतर्गत झालेली फूट कार्यसम्राट म्हणून घेणाऱ्या आमदारांच्या काळजाला भिडली असल्याने त्यांची अाता झोपच उडाली आहे. त्यामुळे अधिवेशनात जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी जाण्याचे सोडून ते गल्ली बोळातील उदघाटने करण्यात धन्यता मानत असल्याची टीका नगराध्यक्ष वर्षा नगरे व उपगराध्यक्ष चंद्रकांत चेडे यांनी केली आहे. 

नगरपंचायतीच्या माध्यामातून व निधीतून पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीकडे जाणा-या पक्या सिमेंट रस्त्याच्या कामाचे उदघाटन आज आमदार विजय औटी यांनी केले. त्यानंतर नगरे व चेडे यांनी ही टीका केली. नगरे म्हणाल्या, "नगर पंचायत ताब्यातून गेल्याने केवळ कामाचे श्रेय लटण्यासाठी त्यांनी या कामाचे तातडीने उदघाटन केले आहे. वास्तविक हे काम नगर पंचायतीचे आहे म्हणून नगर पंचायतीच्या पदाधिका-यांना विश्वासात  घेणे गरजेचे होते. नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष किंवा कार्यालयातील कर्माचा-यांनाही त्यांना या बाबत माहीती न देता परस्पर उदघाटन केले आहे. शिवाय हे कामही अजून पुर्ण झालेले नाही. अद्याप बाजारसमिती पर्यंतचा रस्ता करणे शिल्लक आहे. केवळ विरोधकांच्या कामाचे श्रेय लाटण्याचा हा त्याचा प्रकार केविलवाणा प्रकार आहे." या कामाशी त्यांचा काहीच संबंध नसताना केवळ हुकुमशाही पद्धतीचे त्यांचे हे वागणे आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
आम्ही अाता स्वस्थ  बसणार नाही. त्यांच्या  कार्य काळातील व मागील आडीच वर्षात अनेक कामे निकृष्ठ दर्जाची व चुकीची झाली आहेत. त्या कामांच्या चौकशीची मागणी आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे, असेही नगरे म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com