फडणवीसांच्या कार्यकाळात नागपूरात गुन्हेगारीत वाढ

...
devendra fadnavis
devendra fadnavis

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील युती सरकारच्या कार्यकाळात फडणवीस यांच्याच `होम टाउन`मध्ये मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. विशेष म्हणजेच खून, बलात्कार आणि अपहरणासारख्या घटना प्रत्येक वर्षी वाढतच गेल्याची माहिती माहिती अधिकार कायद्यांतर्गत प्राप्त झाली आहे.

बारामती येथील माहिती अधिकार कार्यकर्ते नितिन संजय यादव यांनी नागपूर शहरातील गुन्हेगारी संदर्भात माहिती मागविली होती. यादव यांना प्राप्त झालेल्या माहितीच्या अनुषंगाने फडणवीस यांच्या कार्यकाळात मोठया प्रमाणात गंभीर गुन्हयांची नोंद झाल्याचे उघडकीस आले आहे.

या माहितीमध्ये खूनासारख्या गुन्हयांनी वर्षाला सरासरी शतकापर्यंत मजल मारली आहे. तर प्रत्येक वर्षी 150 च्या वर बलात्कार झाले आहेत. अपहरणासारख्या गुन्हांनी तर कमालच केल्याचे दिसून येते. प्रत्येक वर्षात सरसरीच्या 300 च्या वर घटना घडल्या आहेत. तर खंडणीच्या घटनांनी अर्धशतक गाठल्याचे दिसून येते.

फडणवीस सरकारमध्ये राज्याचे गृहखाते त्यांच्याकडे होते. पाच वर्षांच्या कालाखंडात राज्याच्या तुलनेत नागपूर येथील घटना वारंवार उघडकीस येत असताना विरोधकांकडून फडणवीस यांच्यावर टिकास्त्र सोडले जात होते.

नागपूर येथील गुन्हयांचा तपशील
................................................................................................................................
वर्ष  -  खून - बलात्कार -अपहरण- खंडणी
................................................................................................................................
2014 -103- 116- 145- 42
2015 -79- 167- 355- 79
2016- 95- 173- 511- 55
2017- 85- 166- 494- 49
2018- 72- 158- 498- 43
जून 2019 पर्यंत 52- 91- 269- 18
एकूण 486- 871- 2272 -286

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com