Court orders to Register offence against Madan Yerawar | Sarkarnama

यवतमाळचे पालकमंत्री मदन येरावार यांच्यासह १६ जणांविरुद्ध गुन्हे नोंदवन्याचे न्यायालयाचे आदेश

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 16 मे 2019

फिर्यादीच्या वडिलांच्या नावे असलेली मालमत्ता हस्तांतरित करून फसवणूक केल्याप्रकरणी यवतमाळचे पालकमंत्री मदन येरावार यांच्यासह इतर १६ जणांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात यावे, असे आदेश चौथे दिवाणी व फौजदारी न्यायाधीश राजकिरण इंगळे यांनी काल मंगळवारी अवधूतवाडी पोलिसांना दिले.

यवतमाळ : फिर्यादीच्या वडिलांच्या नावे असलेली मालमत्ता हस्तांतरित करून फसवणूक केल्याप्रकरणी यवतमाळचे पालकमंत्री मदन येरावार यांच्यासह इतर १६ जणांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात यावे, असे आदेश चौथे दिवाणी व फौजदारी न्यायाधीश राजकिरण इंगळे यांनी काल मंगळवारी अवधूतवाडी पोलिसांना दिले.  यात पालकमंत्री येरावार यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य चित्तरंजन कोल्हे, माजी मंत्री संजय देवतळे यांच्या पत्नी राजश्री, सट्टा किंग व मुख्याधिकारी, भूमिअभिलेख अधिकारी व सहाय्यक दुय्यम निबंधक आदींचा समावेश आहे. या प्रकरणात प्रतिष्ठातांची नावे आल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

फिर्यादी आयुषी हिचे वडील किरण देशमुख यांनी दोन भूखंड २२ एप्रिल १९९९  व ५ फेब्रुवारी २००२  रोजी खरेदी केला होता. त्यानंतर त्याचे मालमत्ता कार्ड क्रमांक १६५७  तयार करण्यात आले. परंतु, यातील संशयित आरोपींनी बनावट दस्त तयार करून मूळ मालकाचे नाव गायब केले. फिर्यादीचे वडील दिवंगत किरण देशमुख यांच्या मालकीचा प्लॉट नं. २२ मध्ये असलेल्या त्यांच्या अविभक्त हिस्सा बळकावून त्यांची परस्पर विल्हेवाट लावली. याबाबत फिर्यादी आयुषी देशमुख यांनी न्यायालयात दाद मागितली. सर्वांचा उद्देश हा फसवणूक करण्याचा असल्याने याप्रकरणी सर्वांविरुद्ध गुन्हे नोंदविण्याचे आदेश अवधूतवाडी पोलिसांना देण्यात आले. 

त्यानुसार आयुषी देशमुख (रा. बाजोरियानगर, यवतमाळ) यांनी चित्तरंजन गुणवंतराव कोल्हे (५४, जिल्हा परिषद सदस्य, रा. झाडगाव ता. राळेगाव), जयश्री दिवाकर ठाकरे (६३, रा. उमरेड, जि. नागपूर), विजयश्री विजयराव कारेकर (५७, रा. राणाप्रतापनगर, नागपूर), जयंत गुणवंतराव कोल्हे (५०, नेल्को सोसायटी, नागपूर), राजश्री ऊर्फ श्‍वेता संजयराव देवतळे (४९, रा. वरोरा, जि. चंद्रपूर), तेजश्री विजय थुटे (४४, वर्धा), दिलीप अनंतराव कोल्हे (५५, रा. बाजोरियागनर, यवतमाळ), अर्चना शशिशेखर कोल्हे (५२), आशीष शशिशेखर कोल्हे (३२), वैशाली बाळासाहेब कोल्हे (५२), अमोल बाळासाहेब कोल्हे (३०, रा. बाजोरियानगर यवतमाळ), शीतल रवी धोटे (२९, रा. राजुरा, जि. चंद्रपूर), मदन मधुकर येरावार (५५, रा. अवधूतवाडी, यवतमाळ), अमित कमलकिशोर चोखाणी (३४ यवतमाळ), तत्कालीन अधिकारी, उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालय यवतमाळ, तत्कालीन मुख्याधिकारी, राजेश मोहिते, नगरपालिका यवतमाळ, तत्कालीन सहायक दुय्यम निबंधक क्रमांक १ नोंदणी कार्यालय, यवतमाळ यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदविण्याचे आदेश अवधूतवाडी पोलिसांना दिले आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख