‘एम्स’मध्ये तपासणीचा सज्जन कुमारला आदेश 

वैद्यकीय तपासणीसाठी गुरुवारी ‘एम्स’मध्ये उपस्‍थित राहण्याचा आदेश न्यायालयाने सज्जन कुमारला दिला. आरोग्याच्या कारणावरून जामिनावर सुटका करण्याची मागणी सज्जन कुमारने याचिकेद्वारे सर्वोच्च न्यायालयात केली आहे.
sajjan kumar
sajjan kumar

नवी दिल्ली : काँग्रेस नेता आणि १९८४ मधील शीखविरोधी दंगलीतील दोषी सज्जन कुमार याची वैद्यकीय तपासणी करण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयाने अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेला (एआयआयएमएस- एम्स) बुधवारी केली. 

सरन्यायाधीश शरद बोबडे, न्या. भूषण गवई आणि न्या. सूर्यकांत यांच्या खंडपीठाने सज्जन कुमारच्या जामीन अर्जावर तातडीने निकाल न देण्यास नकार देत सुनावणी अनिश्‍चित काळासाठी पुढे ढकलली. आरोग्याच्या कारणावरून जामिनावर सुटका करण्याची मागणी सज्जन कुमारने याचिकेद्वारे सर्वोच्च न्यायालयात केली आहे.

वैद्यकीय तपासणीसाठी गुरुवारी ‘एम्स’मध्ये उपस्‍थित राहण्याचा आदेश न्यायालयाने सज्जन कुमारला दिला. त्याला रुग्णालयात ठेवण्याची गरज आहे की नाही याविषयी ‘एम्स’ निर्णय घेईल, असे न्यायालयाने म्हटले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com