court fines for abstaining while hearing | Sarkarnama

नवनीता राणांविरोधात याचिका करणाऱ्यांना पाच हजारांचा दंड

अतुल मेहेरे
बुधवार, 28 ऑगस्ट 2019

नागपूर : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणीसाठी याचिकाकर्ते नंदेश अंबाळकर व त्यांचे वकील वारंवार गैरहजर राहिल्याने उच्च न्यायालयाने त्यांना पाच हजाराचा दंड बजावला.

तर, इतर दोन याचिकांवर तीन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचा आदेश देण्यात आला. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ व सुनील भालेराव यांनी नवनीत कौर राणा यांच्या निवडणुकीला आव्हान देणाऱ्या दोन स्वतंत्र याचिका दाखल केल्या आहेत. तर, तिसरी याचिका नंदेश अंबाळकर यांनी दाखल केली आहे. 

निवडणूक याचिका सुनावणीला येण्यापूर्वी त्याची चाचणी करण्यात येते. त्यावेळी, याचिकाकर्ते अथवा त्यांचे वकील हजर नव्हते. त्यामुळे, उच्च न्यायालयाने आणखीन एक संधी दिली. दुसऱ्यांदा देखील याचिकाकर्ते गैरहजर राहीले. याचिकेवर सुनावणी करताना ही बाब न्यायमूर्ती झेड. ए. हक यांच्या निदर्शनास आली. त्यामुळे, अशाप्रकारे न्यायालयाचा किमती वेळ वाया घालवण्यात येत असल्याचा ठपका ठेवत याचिकाकर्त्याला पाच हजाराचा दंड ठोठावला.

दरम्यान, अडसूळ, भालेराव यांनी दाखल केलेल्या याचिकांवर उत्तर सादर करण्यासाठी राणा यांच्या वकीलांनी चार आठवड्यांचा कालावधी मागितला. मात्र, न्यायालयाने त्यांना तीन आठवड्यात उत्तर सादर करण्याचा आदेश दिला. याचिकाकर्त्यांनुसार, अमरावती लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीकरीता राखीव होता. पण नवनीत राणा यांनी "लुभाणा' जातीचे प्रमाणपत्र दाखल करून निवडणुक लढवली असून त्या अपात्र असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख