साताऱ्यात 'देशी'ची 52 रुपयांची बाटली 150 रुपयांना

"लॉकडाऊन'मुळे रावापासून रंकापर्यंत प्रत्येकालाच कोणत्या अन्‌ कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शहरापासून खेड्यांपर्यंत हेच चित्र कायम आहे. "तळिराम'ही या परिस्थितीला अपवाद नाहीत.
country made liquor illegally sold in satara district
country made liquor illegally sold in satara district

नागठाणे (ता. सातारा) : "ज्याच याड, त्याला ग्वाड' या शब्दप्रयोगाची प्रचिती सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात सध्या प्रत्ययास येत आहे. 'एकच प्याला'साठी आसुसलेल्या तळिरामांची अवस्था 'लॉकडाऊन'मुळे अधिकच बिकट बनली आहे. त्यातच विदेशी मिळेना, देशीला मात्र दुप्पट, तिप्पट पैसे मोजावे लागत आहेत. 'देशी'ची 52 रुपयांची बाटली सध्या 100 ते 150 रुपयांना विकली जात आहे.

"लॉकडाऊन'मुळे रावापासून रंकापर्यंत प्रत्येकालाच कोणत्या अन्‌ कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शहरापासून खेड्यांपर्यंत हेच चित्र कायम आहे. "तळिराम'ही या परिस्थितीला अपवाद नाहीत. एरवी कुठेही गेले, तरी वास काढण्यात वाकबगार असणाऱ्या या मंडळींसमोर सध्या मोठेच प्रश्न उभे राहिले आहेत. 'लॉकडाऊन'मुळे महामार्गालगतचे सर्व बार बंद आहेत. 'देशी'च्या दुकानांची अवस्थाही अशीच आहे. त्यामुळे दुधाची तहान ताकावर भागविण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. विदेशी मिळत नाही. देशी मात्र, छुप्या मार्गाने कुठेतरी उपलब्ध होते. अर्थात तिचा भाव पेलेनासा झाला आहे. 'देशी'ची 52 रुपयांची बाटली सध्या 100 ते 150 रुपयांना विकली जात आहे. विदेशीबाबतही असाच प्रत्यय येताना दिसतो. तंबाखू, गुटखा खाणाऱ्यांची परिस्थितीही याहून निराळी नाही. पानटपऱ्या बंद असल्यामुळे अशा शौकिनांची सध्या चांगलीच पंचाईत झालेली आहे. तरीही छुप्या मार्गाने का होईना ते मिळविण्याच्या प्रयत्नात ही मंडळी दिसत आहेत.

सध्या महामार्गावर पोलिसांचा राबता मोठ्या प्रमाणात आहे. महामार्गावरून जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची पोलिस सध्या कसून चौकशी करत आहेत. त्यात मालवाहतुकीच्या नावाखाली गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर पोलिसांची कडक नजर आहे. त्याच अनुषंगाने महामार्ग पोलिसांनी काल दुपारी महामार्गावर वाहने थांबवून तपासणी केली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com