नाशिक महापालिकेत 220 कोटींचा  एलईडी घोटाळा, तीन अधिकाऱ्यांची चौकशी?  - corruption nashik muncipal | Politics Marathi News - Sarkarnama

नाशिक महापालिकेत 220 कोटींचा  एलईडी घोटाळा, तीन अधिकाऱ्यांची चौकशी? 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 7 जून 2017

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सत्ताकाळात झालेल्या 220 कोटींच्या एलईडी दिवे खरेदी प्रकरणाचे भुत बाटलीतून पुन्हा बाहेर निघाले आहे. यासंदर्भात महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी तीन अधिका-यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या इतिहासातील एक मोठा घोटाळा उघडकीस येण्याची शक्‍यता आहे. 

चौकशीचे आदेश दिलेल्या अधिकाऱ्यांत महापालिकेचे मुख्य अग्निशमन दल अधिकारी अनिल महाजन, स्वेच्छा निवृत्ती घेतलेले माजी अधिक्षक अभियंता आर. के. पवार व विद्युत विभागाचे उपअभियंता नारायण आगरकर यांच्याकडून कामकाजात चुकारपणा व गैरव्यवहार झाल्याचे प्रथम दर्शनी चौकशीत आढळून आल्याने त्यांच्यावर विभागीय चौकशी प्रस्तावित करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी दिले आहेत. यात अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई अटळ राहणार आहे. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख