या नगरसेवकाने पुरवली तब्बल दहा हजार जणांच्या संसाराला मदत

राजकीय नेत्यांचा संकटाच्या काळात कस लागतो. अनेक जण आपापल्या परीने मदत करत असतातच.
umesh-gayakwad-ff
umesh-gayakwad-ff

पुणे : कोरोनाच्या साथीमुळे पुण्यातील अनेक भागांतील मजूर, नागरिकांना दैनंदिना गरजा भागविण्यासाठी तोंड द्यावे लागत आहे. यासाठी पुण्यातील अनेक राजकीय नेते, नगरसेवक आपापल्या परीने मदत करत आहे. कोरेगाव पार्कचे नगरसेवक उमेश गायकवाड यांनी तब्बल दहा हजार गरजूंची महिनाभराची जबाबदारी घेतली आहे.

प्रत्येक गरजूच्या घरी ५ किलो गव्हाचे पीठ, तीन किलो तांदूळ, एक किलो पॅकेट तेल, एक किलो - डाळ आणि एक वडी साबण असे जिन्नस गायकवाड यांच्यामार्फत पुरविण्यात आले आहेत. महापौर मुरलीधर मोहोळ, भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी मंत्री दिलीप कांबळे यांच्या उपस्थितीत प्रातिनिधिक स्वरुपात हे काम सुरू करण्यात आले.

गायकवा यांनी स्वखर्चातून आपल्या भागात निर्जंतुकीकरण कक्ष सुरू केला असून (sanitization chamber) यामध्ये ‘प्रेशर फॉगिंग सिस्टम' असते. यातुन एका वेळास एक व्यक्ती ‘10 सेकंद’ उभा राहिल्यास,  त्याचे निर्जंतुकीकरण होऊन त्याचा परिणाम पुढील काही तासांसाठी राहतो. ही केंद्रे

सिटाडेल कॉम्प्लेक्स, बी.टी कवडे रोड, घोरपडी, गणपती मंदिर, पिंगळे वस्ती, मुंढवा,. कोरेगाव पार्क पोलिस स्टेशन, कोरेगाव पार्क आणि बुध्द विहार, संकल्प मित्र मंडळ चौक, ताडीवाला रोड या ठिकाणी सुरू कऱण्यात आली आहे. आपल्या भागात घरपोच सेवा देणाऱ्या लोकांनी घरपोच सेवा देताना सदर मालासह आपण या कक्षातूनच प्रवेश करून हा माल घरपोच करावा, अशी व्यवस्था गायकवाड यांनी केली आहे.  या भागात तैनात असलेले सर्व पोलिस कर्मचारी,  सर्व आरोग्य कर्मचारी, सर्व बँकेचे कर्मचारी सर्व अत्यावश्यक सेवा देणारे दुकानदार यांना या कक्षाचा उपयोग होणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com