नगरसेवकाने पाठीवर पंप घेऊन स्वतः केली फवारणी

पुणेकरांच्या जवळ जाण्याचा नगरसेवकांचा या निमित्ताने प्रयत्न
balwadkar-fogging
balwadkar-fogging

पुणे : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येकजण आपअपाल्या पातळीवर प्रयत्न करीत आहे. राजकीय नेते, कायकर्तेदेखील यात आघाडीवर आहेत. पुण्यातील भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी चक्क पाठीवर फवारणी पंप घेऊन बसस्टॉप व पीएमटी बस निर्जंतुकीकरण केले.

राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रूग्ण पुण्यात सापडल्याने पुणेकरांमध्ये धास्तीचे वातावरण पसरले आहे. गेल्या तीन दिवसांपासून बहुतांश पुणे बंद आहे. वर्दळीच्या रस्त्यावरदेखील शुकशुकाट आहे.आणखी किमान दहा दिवस संपूर्ण पुणे शहर बंदच राहणार आहे. या परिस्थितीत स्वच्छता व निरजतुकीकरण महत्वाचे आहे. प्रत्येक नगरसेवक, राजकीय पक्षाचा कार्यकर्ता, स्वयंसेवी संस्था आपआपल्या पातळीवर जनजागृतीचे तसेच प्रत्यक्ष स्वच्छतेचे काम करताना दिसत आहे.

या पार्श्वभूमीवर पुण्यातील बाणेरचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी त्यांच्या परिसरात येणारी पीएमटीची बस तसेच या भागातील बसथांबा फवारा मारून निजतुक केला. नगरसेवकांनीच हाती पंप घेतल्याने उपस्थित नागरिक कौतुक आणि उत्सुकतेने पाहू लागले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com